• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट

July 23, 2026 by admin Leave a Comment


नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशातील राजकीय वातावरण तापले असून विविध संघटना आणि पक्षांकडून आंदोलन सुरू आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारच्या हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे.

सीजेप कॉक्रोज जनता पार्टीने नीट पेपरफुटी प्रकरणाचा अनेक दिवसांपासून पाठपुरावा केला आहे. सीजेपीचे कार्यकर्ते गेल्या 2 दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करत आहेत. दरम्यान, केंद्र सरकारनेही या घडामोडींची गंभीर दखल घेतल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलनाची तीव्रता वाढत असताना राजकीय हालचालींनाही वेग आला आहे.

याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसद भवनात दाखल झाले आहेत. ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्याच्या लोकसभेतील परिस्थिती तसेच सुरू असलेल्या आंदोलनाबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार आणि सरकारकडून पुढे काय भूमिका घेतली जाणार, याकडे देशभरातील विद्यार्थी, पालक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Flood: नेपाळच्या महापुरातून थोडक्यात बचावला अभिनेता; जिथे 12 तासांपूर्वी फोटो काढले, तिथेच आला महाप्रलय
  • रात्र सरताच दिवसा तरंगायला लागले मृतदेह, भूतनाथ तलावात भयंकर प्रकार; 5 दिवसापूर्वी घडलं असं काही की… लोकांमध्ये एकच भीती!
  • ज्याची भीती तेच घडले, नेपाळमधून हादरवणारी माहिती, 392 जणांचा मृत्यू, 1200 हून अधिक बेपत्ता, महाराष्ट्रातील..
  • IND vs SL: भारतीय संघाचं काम सोप केलं, संधीचं सोनं केलं, तरीही रिकाम्या हाताने घरी जावं लागलं, पडिकलमुळे झाला ‘गेम’
  • प्रताप सरनाईकांचा निर्णय फिरवला, मराठी भाषेसंदर्भातील फडणवीसांच्या निर्णयावरून महायुतीत धुसफूस? घडलं काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in