• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी ! हवालदारापासून कमिश्नरपर्यंत… दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्या पुढील आदेश येईपर्यंत रद्द

July 24, 2026 by admin Leave a Comment


गेल्या पाच दिवसांपासून दिल्लीच्या जंतरमंतवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. सोमवारी तर दिल्लीत पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जचे देशभर पडसाद उमटले होते. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, तरीही खरबदारीचा उपाय म्हणून आता दिल्ली पोलीस दलाने सर्वच पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

दिल्ली पोलीस आयुक्तालयांनी आज आदेशच काढले आहेत. कॉन्स्टेबलपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे आदेश लागू आहेत. पुढील आदेश मिळेपर्यंत कुणीही सुट्टी घ्यायची नाही. सध्याची कायदा आणि सुव्यवस्था पाहता कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला सामान्य सुट्टी, अर्जित सुट्टी आणि इतर नियमित सुट्टी देण्यात येणार नाही, असं पोलीस आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटलं आहे.

आणखी एक आदेश जारी

केवळ वास्तविक आपत्कालीन परिस्थितीच सुट्टी मंजुर केली जाणार आहे. त्यासाठी सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीची गरज आवश्यक आहे. सर्व पोलीस उपायुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या आदेशाचं सक्तीने पालन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी अजून एक आदेश जारी केला आहे. पुढील आदेशापर्यंत कोणताही पोलीस कर्मचारी, मग तो कोणत्याही रँकचा असो त्याला पोलीस आयुक्तांच्या परवानगी शिवाय कोणत्याही प्रशिक्षण, कोर्स वा कोणत्याही कार्यक्रमात भाग घेता येणार नाही. हे आदेश पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतरच जारी करण्यात येणार आहेत.

अनेक पोलीसही जखमी

सोमवार आणि मंगळवारी दिल्लीत आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. त्यानंतर दगडफेकीच्या घटनाही घडल्या. त्यात असंख्य आंदोलक जखमी झाले. अनेकांची डोकी फुटली. रक्त वाहिलं. तर अनेक पोलीसही जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. आज पाचव्या दिवशीही तरुणांनी जंतरमंतर सोडलेलं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा हिंसा भडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Jayant Patil: पक्ष बदलाच्या चर्चा अन् भर सभेत जयंत पाटील यांचे बेधडक उत्तर, म्हणाले…
  • Dharashiv Politics : ओमराजे निंबाळकरांनी पक्ष बदलताच गेम फिरला, धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नगरसेवक फुटले
  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in