
पक्ष प्रवेश बाबत भर भाषणात जयंत पाटील यांनी दिलखुलास बोलूनच दाखवले. निमित्त होते ते निष्ठावंत दिलीप पाटील यांच्या वाढदिवसाचे. परिस्थिती नुसार बदलत गेले ना तर त्या माणसाची व्हॅल्यू कमी होत जाते. त्यामुळे निष्ठा असणे गरजेचे आहे. “मला पद मिळेल न मिळेल त्यात काय आता लगेच”. पण गत सोडायची नसते. कारण ती माणसं नवीन आहेत. पण आपली मानस आपलीच. आपल्या बरोबर असतात यालाच राजकारणात महत्व द्यायचे असते. आणि निष्ठा महत्वाची आहे असे सांगून भर सभेत पक्ष प्रवेश बाबत बोलत असताना एकच हश्या पिकला. ते सांगलीच्या ईश्वरपूर मध्ये बोलत होते. गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेत्यांच्या भेटीगाठीने चर्चांना पेव फुटले होते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचाही दावा वरचेवर करण्यात येतो. त्याचवेळी जयंत पाटील यांनी जाहीर सभेत मोठा खुलासा केला. त्यांनी कोणत्याही पक्षात जात नसल्याचे सांगत निष्ठेला महत्त्व असल्याचे या कार्यक्रमात अधोरेखित केले.
जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक दिलीप तात्या पाटील यांचा वाढदिवसा निमित्त निष्ठा आणि जीवनावर आधारित फिडेल नावच पुस्तकाच अनावरण यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शशिकांत शिंदे, अमोल कोल्हे, जयंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दिलीप पाटील यांनी वाळवा ला मुख्यमंत्री पद मिळाला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नाव निघायला हवे.असे भर सभेत बोलून दाखवले. यावेळी जयंत पाटील यांनीही आपल्या शैलीत पक्ष प्रवेश बाबत बोलूनच दाखवले.
निष्ठा फार महत्त्वाची
राजकारण फार महत्वाचे असते. राजकारण हे निष्ठेने, तत्वाने, होण्याचा काळ मागच्या 10 वर्षात संपला आहे.पण आता असे कधीच होणार नाही असे समजू नका. या सगळ्या परिस्थिती वर दिवस जात असतात हाच त्यांचा पर्याय आहे. निष्ठा फार महत्वाची आहे त्याला रिव्ह्याल्यू आहे. निष्ठा बुडल्या सारखी वाटते. पण पूर येऊन गेल्यावर त्या निष्ठेकडेच लोक बघत असतात. आपल्याला सगळ्या सारख व्हायचं असेल तर उद्या सकाळीच.आम्ही 10 आमदार 8 खासदार आहे. काही सस्पेंड आहे का नाही, असेही जयंत पाटील म्हणाले.
कृष्णा काठची आण
कृष्णा काठच्या लोकांची आपली परंपरा लढाईची आणि संघर्षाची आहे. संघर्ष करण्याचं या कृष्णा काठच्या लोकांना शिकवले आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील अनेक नवे आहेत. त्यामुळे या कृष्ण काठच्या माणस आम्ही फार वेगळी आहोत. आमच्या मनात काय आहे हे सहजासहज इतरांना कळत नाही. असेही जयंत पाटील म्हणाले.
Leave a Reply