• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचं मोठं पाऊल, थेट…, वेगवान घडामोडी

July 25, 2026 by admin Leave a Comment


राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे अखरे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. नीट पेपर लीक प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देशभरातून होत होती. त्यासाठी गेल्या महिनाभरापासून कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने दिल्लीमधील जंतर मंतरवर आंदोलन सुरू होतं. सोनम वांगचूक यांनी देखील शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी उपोषण केलं. त्यानंतर कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने संसदेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यामुळे वातावरण आणखी तापलं. शुक्रवारी सीजेपी आणि सरकार यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत सीजेपीच्या सिष्टमंडळाने सरकारसमोर तीन मोठ्या मागण्या ठेवल्या होत्या.

पहिली मागणी म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, वीस जुलैच्या आंदोलनामध्ये जे विद्यार्थी सहभागी झाले होते, त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल होऊ नये आणि ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी, त्यानतंर सरकारने सीजेपीच्या शिष्टमंडळाकडे वेळ मागितला होता. अखेर आज धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा सिजेपीचं शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये बैठक झाली, या बैठकीत तीनही मागण्या पूर्ण झाल्याची माहिती शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी आता आपली ट्विटर प्रोफाईल बदलली आहे. पूर्वी त्यांच्या ट्विटर प्रोफाईलवर शिक्षण मंत्री असल्याचा उल्लेख होता. मात्र आता त्यांनी ती माहिती हटवली आहे, आता त्यांच्या ट्विटर प्रोफाईलवर ते खासदार आहेत, फक्त एवढीच माहिती ठेवण्यात आली आहे.  या सर्व पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in