• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! युद्ध भडकलं, आता थेट इराणचा मित्र मैदानात, भीषण हल्ल्यानं जग हादरलं, पाकिस्तानही युद्धात उडी घेणार?

August 9, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा अमेरिका आणि इराणमध्ये युद्धाला सुरुवात झाली आहे. अमेरिकेकडून इराणच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात येत आहे, तर दुसरीकडे इराणकडून देखील मध्य पूर्वेत असलेल्या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले सुरू आहेत. मात्र आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे या युद्धात आता यमनच्या हुती बंडखोरांची एन्ट्री झाली आहे. हे हुती बंडखोर इराणचे मित्र आहेत. हुती बंडखोरांकडून आता थेट सौदी अरेबीयावर हल्ला करण्यात आला आहे. हुती बंडखोरांकडून सौदी अरेबियाच्या जुबैलमध्ये असलेल्या बेरी गॅस प्लांटवर भीषण हल्ला करण्यात आला आहे. सौदी अरेबियामध्ये जे काही मोठे गॅस प्रोसेसिंग युनिट्स आहेत, त्यामध्ये बेरी गॅस प्लांटचा समावेश होता. हुती बंडखोरांनी केलेल्या या हल्ल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

हुती बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या ज्या बेरी गॅस प्लांटवर हल्ला केला, त्या एका प्लांटमधून संपूर्ण जगाला जेवढ्या गॅसची गरज आहेत, त्यातील तब्बल 6 ते 7 टक्के गॅसचा पुरवठा होतो, यावरूनच हा प्लांट किती मोठा आहे, याची कल्पना येते. तसेच ज्या प्लांटवर हा हल्ला झाला आहे, त्या प्लांटचं सौदी अरेबियाच्या एकूण जीडीपीमधलं योगदान हे सात टक्क्यांपेक्षा अधिक आहे. मात्र हा हल्ला जरी सौदी अरेबियावर झाला असला तरी देखील या हल्ल्यानंतर आता खरी परीक्षा ही ‘इस्लामिक नाटो’ देशांची सुरू झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी सौदी अरब, तुर्कस्थान आणि पाकिस्तान या तीन देशांनी एकत्र येऊन इस्लामिक नाटोची स्थापना केली आहे. इस्लामिक नाटोच्या करारानुसार यातील एकाही सदस्य देशावर इतर देशाकडून हल्ला झाला, तर तो हल्ला यामध्ये सहभागी असलेल्या सर्व देशांवर माण्यात येईल. त्यामुळे आता हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे, की हुती बंडखोरांनी सौदी अरेबियावर हल्ला केल्यानंतर आता या युद्धात पाकिस्तानची एन्ट्री होणार का? पाकिस्तान नेमकी काय भूमिका घेणार?

सौदी अरेबियाच्या ज्या गॅस प्लांटवर हल्ला झाला तो गॅस प्लांट हा तांबड्या समुद्राजवळ आहे, आणि या तांबड्या समुद्रावर गेल्या अनेक वर्षांपासून हुती बंडखोरांचं एकहाती वर्चस्व आहे. हुती बंडखोरांनी या आधी देखील अनेकदा इराणला मदत केली आहे, त्यानंतर आता पुन्हा एकदा सौदी अरेबियावर त्यांनी भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर सौदी अरेबियाच्या या प्लांटला भीषण आग लागली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IND vs SL : रवींद्र जडेजाने अखेर सूड घेण्यासाठी सात दिवस घेतले! श्रीलंकन खेळाडूसोबत काय घडलं होतं?
  • मराठी सक्तीविरोधात रिक्षा, टॅक्सी चालकांची उच्च न्यायालयात धाव
  • मोठी बातमी! लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र होणार? वन नेशन वन इलेक्शनबाबत मोठी अपडेट!
  • Tapsee pannu : तुम्हाला फार मजा येत्ये का ? कंगनाचं नाव काढताच भडकली तापसी पन्नू, फटकारत म्हणाली..
  • मराठी सक्तीचा वाद चिघळला, रिक्षा-टॅक्सी चालकाची थेट हायकोर्टात धाव, याचिकेत आरोप काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in