• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये जेन-झीसाठी 3 डबे आरक्षित होणार? रेल्वेमंत्र्यांकडे मागणी, सरकार काय निर्णय घेणार?

August 11, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीच्या जंतर-मंतरवर जेन-झी आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे देशभर पडसाद उमटले होते. विद्यार्थी आंदोलनामुळे मोदी सरकारलाही झुकावं लागलं होतं. देशभर पसरलेल्या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भारतात जेन-झी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आता या आंदोलकांनी नाराजी दूर करून आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत देखील तरुणांशी संवाद साधता दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील रात्री इन्स्टाग्रामवरून विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. आता भाजप नेतेही जेन-झी पुढे सरसावले आहेत. भाजपच्या नगरसेविका तेजस्वी घोसळकर यांनी जेन-झी पिढीसाठी महत्त्वाची मागणी केली आहे.

तेजस्वी घोसाळकर यांनी कॉलेजला जाणाऱ्या जेन-झी आणि जेन-अल्फा पिढीसाठी लोकलमधील 12 पैकी 3 डबे आरक्षित करण्याची मागणी केली आहे. हे डबे पहाटे 5 ते सकाळी 11 वाजेपर्यंत आरक्षित ठेवण्याची ठेवण्याची मागणी तेजस्वी घोसाळकर यांनी केली आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून मागणी केली आहे. त्यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन डबे आरक्षित करण्याची मागणी केली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण, पेट्रोल आणि डिझेल स्वस्त? जाणून घ्या आजचा भाव..
  • Horoscope Today 26th August 2026 : नशीब बदलण्याचे संकेत ! आज या राशींना मिळू शकतो मोठा फायदा; तुमची रास यात आहे का?
  • Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! सरकारने दिले रक्षाबंधनचे गिफ्ट, थेट खात्यात…
  • Bus Accident : भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरमध्ये घुसली, 5 ठार 20 जखमी
  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in