• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! पेच वाढला, बंडखोर खासदार अडचणीत? शिवसेना ठाकरे गटाने शेवटचा डाव टाकला

June 18, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी तब्बल 6 खासदांनी बंडखोरी केली आहे. हे सर्व खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. दरम्यान या सर्व खासदारांना सुरक्षेच्या कारणामुळे आता दिल्लीमधून राजस्थानमध्ये हलवण्यात आलं आहे. त्यांना वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. रविवारी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलावली होती, मात्र या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे 9 पैकी फक्त 4 खासदारच प्रत्यक्षात उपस्थित होते. बाकी सर्व ऑनलाईन उपस्थित होते असा दावा केला जात होता.

दरम्यान त्यानंतर 6 खासदारांनी बंडखोरी केल्याचं समोर आलं. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटात हालचांलींना वेग आला, शिवसेना ठाकरे गटाकडून आज तातडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीसाठी सर्व खासदारांना व्हीप देखील बजावण्यात आला होता. मात्र तरी देखील आजच्या बैठकीला केवळ तीनच खासदार उपस्थित होते. या बैठकीनंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. यामुळे बंडखोर खासदारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटाकडून या बंडखोर आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे.  बैठकीला अनुपस्थित असलेल्या 6 बंडखोर खासदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. कुठलीही पूर्वकल्पना न देता तुम्ही बैठकीला अनुपस्थित का  राहिले? असा सवाल या नोटीसच्या माध्यमातून सर्व अनुपस्थित खासदारांना विचारण्यात आला आहे, तसेच तुमचं म्हणणं 7 दिवसांच्या आत मांड, अशी सुचना देखील या खासदारांना करण्यात आली आहे.  पक्षाचे व्हीप अनिल देसाई यांनी ही नोटीस बजावली आहे. या नोटीसला आता हे खासदार काय उत्तर देणार? उत्तर देणार की नाही देणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. उद्याच या बंडखोर खासदारांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Horoscope Today 26th August 2026 : नशीब बदलण्याचे संकेत ! आज या राशींना मिळू शकतो मोठा फायदा; तुमची रास यात आहे का?
  • Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! सरकारने दिले रक्षाबंधनचे गिफ्ट, थेट खात्यात…
  • Bus Accident : भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरमध्ये घुसली, 5 ठार 20 जखमी
  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in