• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! पाकिस्तानचे दोन तुकडे होणार? 15 जुलैला पाकच्या संसदभवनातून होणार सर्वात मोठी घोषणा

July 11, 2026 by admin Leave a Comment


पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या सरकारविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. जम्मू -काश्मीर जॉइंट अवामी अ‍ॅक्शन कमेटी (JAAC) या आंदोलनाचं नेतृत्व करत आहे. 15 जुलै रोजी आम्ही पाकिस्तानच्या संसद भवनातून स्वातंत्र्याची घोषणा करू, असं जम्मू -काश्मीर जॉइंट अवामी अ‍ॅक्शन कमेटीने म्हटलं आहे. पाकिस्तानी सैन्याने ताबडतोब पाक व्याप्त काश्मीर सोडून निघून जावे, अशी मागणी देखील पीओकेच्या स्थानिक नेत्यांकडून होत आहे. पाकिस्तानच्या सैन्याकडून पाक व्याप्त काश्मीरमधील काही भाग हे दहशतवादी क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहेत, याचा देखील स्थानिक नेत्यांकडून निषेध करण्यात आला आहे.

पाक व्याप्त काश्मीरमध्ये सध्या परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. हजारो लोक ईदगाह मैदानावर एकत्र जमले आहेत. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू असून, स्थानिक नेते आणि नागरिकांकडून पाकिस्तान सरकारकडून सुरू असलेला अत्याचार दाखवण्यासाठी विदेशी मीडियाला आमंत्रित करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी पाक व्याप्त काश्मीरमध्ये सरकारविरोधात एक आंदोलन सुरू होतं, या आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांवर असीम मुनीर याच्या आदेशाने पाकिस्तानी सैन्याकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता, या गोळीबारात तब्बल 30 नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर पीओकेमधील आंदोलन अधिकच पेटलं. येथील स्थानिक नेत्यांनी या हत्याकांडाची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडशी केली आहे.

27 जुलै रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे, त्यापूर्वीच आमच्या 38-सूत्रीय आर्थिक आणि संवैधानिक मागण्या पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी पाकव्याप्त काश्मीरमधील नेते तसेच जम्मू -काश्मीर जॉइंट अवामी अ‍ॅक्शन कमेटीकडून करण्यात आली आहे. दरम्यान 15 जुलै रोजी आम्ही पाकिस्तानच्या संसद भवनातून स्वातंत्र्याची घोषणा करू असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पीओकेला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे, तब्बल 17 हजार सैनिक सध्या स्थितीमध्ये पीओकेमध्ये तैनात आहेत. आंदोनाला आता हिंसक वळण लागलं आहे. पाकिस्तानी सैन्यांकडून स्थानिक लोकांवर अत्याचार सुरू आहेत. मात्र येथील नागरिक देखील आता मैदानात उतरले असून, आम्ही माघार घेणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in