• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं….

June 16, 2026 by admin Leave a Comment


पिंपरी-चिंचवड  शहरातील आकुर्डी परिसरात एका खासगी रुग्णालयात महिला रुग्णाचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित डॉक्टरला पोलिसांनी अटक केली असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आकुर्डी येथील एका रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत डॉक्टरने अश्लील कृत्य करत तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेने याबाबत निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी डॉक्टर धैर्यशील शेटके याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 75 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे. तसेच पुढील तपासानंतर आरोपी डॉक्टरला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातही खळबळ उडाली असून, पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. तसेच रुग्णालय प्रशासनाची भूमिका आणि इतर बाबींचीही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IND vs IRE: भारतविरुद्ध मैदानात उतरणार ‘राजस्थानचा मुलगा’; आयर्लंडच्या संघात एन्ट्री मिळवणारा जय मुंद्रा कोण?
  • 248 कोटींचा मालक असलेल्या अभिनेत्याने घेतली बागेश्वर बाबांची भेट; जमिनीवर बसून केली चर्चा
  • मुंबईकरांनो सावधान! काल बीकेसीत तर आज रेल्वे स्थानकावर आढळले विषारी साप; चक्क रेल्वेच्या… पहा व्हिडीओ
  • Jalna Thackeray Sena Protest | 6 फुटीर खासदारांच्या विरोधात खोके घेऊन रस्त्यावर उतरले ठाकरे समर्थक! थेट भीक मागत…
  • ED Raids: मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या मंत्र्यांच्या जावयाच्या घरावर ईडीचे छापे, मोठी खळबळ, सापडले घबाड?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in