
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांचा पक्ष NDA सोबत जाण्याची चर्चा रंगली आहे. अशातच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. पाटील यांच्यासोबत अजित दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हेही सोबत आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधान आले आहे. सध्या या चारही बड्या नेत्यांची बैठक सुरू असल्याची माहितीही समोर आली आहे.
जयंत पाटील फडणवीसांच्या भेटीला
समोर आलेल्या माहितीनुसार, आज सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते. त्यानंतर आता जयंत पाटीलही वर्षा या निवासस्थानी बैठकीसाठी दाखल झाले आहेत. तब्बल अर्धा तासापासून या नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे. यात शरद पवारांचा पक्ष एनडीएसोबत जाण्याबाबत चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही काळापासून ज्या राजकीय चर्चा सुरू आहे, त्यामुळे या भेटीला खास महत्त्व प्राप्त झाले आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply