• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! पंजाबमध्ये आपच्या वादळात भाजप भुईसपाट; यापूर्वी असा पराभव कधीच झाला नाही, आम आदमी पार्टीचा 680 जागांवर विजय

May 30, 2026 by admin Leave a Comment


पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने भाजपला मोठा झटका दिला आहे. पंजाबमध्ये 26 मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं होतं. ज्यामध्ये आठ महानगर पालिका, 75 नगर परिषद आणि 20 नगर पंचायतींच्या निवडणुकीचा समावेश होता. आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीमध्ये आपने जोरदार मुसंडी मारली आहे. तब्बल 680 पेक्षा अधिक जागांवर आपचे उमेदवार विजय झाले आहेत. तर भाजपला अवघ्या 52 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. या निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पंजाबमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील आपचं वादळ आल्याचं पहायला मिळत आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका हा भाजपला बसला आहे. तर काँग्रेस आणि आकाली दलाचा देखील मोठा पराभव झाला आहे. या निवडणूक निकालावरून स्पष्ट झालं आहे की, अजूनही पंजाबमध्ये आपची जादू कायम आहे. हा भाजपसाठी मोठा झटका मानला जात आहे.

पंजाबमध्ये या निवडणुकीपूर्वी भाजपने पक्षात काही मोठे बदल केले होते. केवलसिंह ढिल्लो यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. भाजपला आशी आशा होती की, प्रदेशाध्यक्षपदी नवा चेहरा दिल्यानं त्याचा पक्षाला फायदा होऊ शकतो. केवलसिंह ढिल्लो हे कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करतील, विधानसभा निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होईल. मात्र पंजाबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या अपेक्षांवर पाणी फिरल्याचं पहायला मिळत आहे. या निवडणुकीत आपचा ऐतिहासिक असा विजय झाला आहे, तब्बल 680 पेक्षा जास्त जागा आपने पंजाबमध्ये जिंकल्या आहेत. तर भाजपला अवघ्या 52 जागांवर समाधान मानवं लागलं आहे. काँग्रेस आणि आकाली दल देखील आपच्या या वादळात उडाले आहेत.

दरम्यान राजकीय तज्ज्ञांच्या मते पंजाबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये झालेला भाजपचा पराभव हा भाजपसाठी केवळ एक इशारा नसून विधानसभा निवडणुकीपूर्वी धोक्याची घंटी आहे. पंजाबमध्ये स्थानिक मुद्दे हे राष्ट्रीय मुद्द्यांवर भारी पडल्याचं दिसून येत आहे. भाजपला अजूनही पंजाबमध्ये पुरेसा जनाधार नसल्याचं या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आलं आहे. आप हा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये राज्यात नंबर एकचा पक्ष ठरला आहे. आपने प्रचंड यश या निवडणुकीमध्ये मिळवलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुदिन्याचे आरोग्यदायी फायदे ॲसिडिटी, पोटफुगी आणि पचनाच्या समस्यांवर नैसर्गिक उपाय
  • श्रद्धा कपूरच्या बहुप्रतिक्षित ‘ईठा’ चित्रपटाच्या नावावर आक्षेप, राष्ट्रवादी चित्रपट विभागाची मागणी काय?
  • IPL 2027: ऋषभ पंत संघातून आऊट होताच लखनौ सुपर जायंट्सचा असा गेम, या खेळाडूकडे कर्णधारपद देणार!
  • दुर्गंधी सुटली म्हणून लोक टेरेसवर पळाले, कोपऱ्यातील गोणी उघडताच… चार दिवसानंतर सत्य आलं बाहेर; नाशिक हादरलं
  • विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अधिकाऱ्यांनाही…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in