• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! दिल्लीत इंटरनेट सेवा बंद, मोठा निर्णय, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान..

July 23, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थी दिल्लीत दाखल झाले. पोलिसांवर काल रात्री टार्गेट करत हल्ला करण्यात आला. ज्यात काही पोलिस अधिकारी जखमी झाले. जंतर मंतरवर सतत आंदोलकांची संख्या वाढत आहे. देशाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. संसद परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त आहे. या आंदोलनाला हिंसक वळण आले. थेट संसदेवर मोर्चा नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक ठाम आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या घराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नीट पेपरफुटीचे प्रकरण फास्ट-ट्रॅक कोर्टात चालवले जाणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, कॉकरोच जनता पार्टीला कोणत्याही परिस्थितीमध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा आहे.

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. देशातील अनेक शहरात आंदोलने सुरू आहेत.  मात्र, सरकारकडून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही. आंदोलक अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. दिल्लीतील काही मेट्रो स्टेशन देखील बंद ठेवण्यात आलीत. आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे आल्याने खळबळ उडाली.

पोलिसांना टार्गेट करत हल्ले केले जात आहेत. यासोबतच बांगलादेशमध्ये जे घडले तेच होईल, असेही काही आंदोलकांकडून बोलले जात आहे, ज्यामुळे या आंदोलनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. संसद भवन परिसरात कडक बंदोबस्त आहे. दिल्लीत पोलिस आणि इतर यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. जंतर मंतरवरील वाढणारी गर्दी डोकेदुखी ठरत आहे.

पाकिस्तानच्या काही सोशल मीडिया अकाऊंटवरून तरूणांची माथी भडकवणारी व्हिडीओ व्हायरल केली जात आहेत. त्यामध्येच आता दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. कोणत्याही प्रकारचे भडकावू भाषण आणि व्हिडीओ व्हायरल होऊ नयेत, याकरिता दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. हा अत्यंत मोठा निर्णय म्हणावा लागेल. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव वाढत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Special Report : एकामागून एक महाआपत्ती… नेपाळच का बनतंय निसर्गाचं ‘फेव्हरेट टार्गेट’?
  • Chitra Wagh : राजकारणात काम करतांना महिलांना अनेक..रितू तावडे, किशोरी पेडणेकरांना भेटल्यानंतर चित्रा वाघ यांचं महत्वाचं विधान
  • रक्षाबंधनावर आधारित हे गाणं ऐकून डोळ्यांत येईल पाणी, चित्रपटाची कथा एकदम जबरदस्त
  • थलपती विजय आता पंतप्रधानपदाच्या शर्यतीत, नव्या सर्व्हेमुळे राहुल गांधींची चिंता वाढली, नेमकी आकडेवारी काय
  • सचिनला येतीये सीमा हैदर अन् मुलांची आठवण, रडायला लागला, व्हिडीओमध्ये म्हणाला…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in