• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस, कँटीन बंद करण्याचे आदेश

July 31, 2026 by admin Leave a Comment


अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अन्नसुरक्षा मोहिमेचा धडाका आता सरकारी आस्थापनांपर्यंत पोहोचला आहे. राज्यभरातील नामांकित हॉटेल्स आणि खाद्य व्यवसायांवर कारवाई केल्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या कँटीनवरही एफडीएने कारवाई केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या एका सुनावणीदरम्यान सरकारी आस्थापनांतील कँटीनचीही तपासणी करण्यात येत आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने उच्च न्यायालय परिसरातील कँटीनची तपासणी केली. तपासणीत न्यायालयातील कँटीन आवश्यक FSSAI (Food Safety and Standards Authority of India) परवान्याशिवाय सुरू असल्याचे आढळून आले.

या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने संबंधित कँटीन चालकाला तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अन्नसुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारातील एकूण तीन कँटीनना अन्न व औषध प्रशासनाने नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि संबंधित कँटीन व्यवस्थापनामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, राज्यभर सुरू असलेल्या एफडीएच्या तपासणी मोहिमेमुळे खासगी तसेच सरकारी आस्थापनांमधील अन्नसुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अँटिलियामधील सिक्यूरिटी गार्डला किती पगार? आकडा ऐकून चक्रावून जाल
  • हा द्रव पदार्थ म्हणजे सापांचा कर्दनकाळच, महिन्यातून फक्त एकदा शिंपडा, पुन्हा आयुष्यात साप दिसणार नाही
  • Akshaye KhannaMahakali : ‘हा धर्म की अधर्म?’ अक्षय खन्नाच्या ‘शुक्राचार्या’चा धडकी भरवणारा अवतार; ‘महाकाली’चा प्रोमो चर्चेत
  • 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा, CA चे हादरवणारे कारनामे उघड; आज करणार कोर्टात हजर
  • साखरेनंतर कांदाही महागला, पण या App वर मिळतोय सर्वात स्वस्त कांदा, 1 किलोची किंमत फक्त…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in