• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का, इच्छा नसूनही इराणविरोधातील युद्ध थांबवावं लागणार?

May 20, 2026 by admin Leave a Comment


28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलकडून इराणवर पहिला हल्ला झाला आणि जगात एका भीषण अशा युद्धाला सुरुवात झाली. या युद्धात अमेरिकेनं देखील उडी घेतील. अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. मात्र इराणने देखील आपल्या मिसाईल आणि ड्रोन हल्ल्यानं अमेरिका आणि इस्त्रायलच्या नाकेनऊ आणले, शेवटी 40 व्या दिवशी अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला. मात्र जरी युद्धविराम झाला असला तरी देखील दोन्ही देशांमध्ये अजूनही संघर्ष कायम आहे. इराणने अण्वस्त्र करार करावा आणि त्यांनी अण्वस्त्र तयार करू नयेत यासाठी इराणवर अमेरिकेकडून वारंवार दबाब आणण्यात येत आहे. नुकतीच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा एकदा इराणला धमकी देण्यात आली आहे, जर इराणने लवकरात लवकर करार केला नाही तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा हल्ला करू, आमच्याकडे सैन्य तयार आहे, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेच्या संसदेमध्ये राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची सैन्य शक्ती मर्यादित करण्याचा प्रस्ताव पास झाला आहे. विशेष म्हणजे हा प्रस्ताव संसदेत मांडण्यात आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाच्या रिपब्लिकनच्या 4 खासदारांनी देखील ट्रम्प यांच्याविरोधात डेमोक्रेट्स पक्षाची साथ दिली आहे. तीन खासदार मतदानाच्या वेळी उपस्थित नव्हते, तर एका खासदाराने ट्रम्प यांच्याविरोधात मतदान केलं आहे.

50-47 मतांनी हा प्रस्ताव पास झाला आहे, हा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र अजूनही या प्रस्तावाचं कायद्यात रूपांतर होण्यासाठी काही प्रकिया आहेत, ज्या पार केल्यानंतरच या प्रस्तावाचं कायद्यात रुपातंर होणार आहे. जर या प्रस्तावाचं कायद्यात रूपांतर झालं तर त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना इराणसोबत युद्ध सुरू ठेवण्यासाठी काँग्रेसची परवानगी घ्यावी लागणार आहे. काँग्रेसकडून परवानगी मिळणं हे वाटतं तितकं नक्कीच सोपं नसणार आहे, त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना इच्छा नसून देखील इराणविरोधातील युद्ध थांबावं लागण्याची शक्यता आहे. सीनेटमध्ये या प्रस्तावावर अंजून फायनल मतदान बाकी आहे, समजा जरी हा प्रस्ताव मंजूर झालाच आणि त्याविरोधात डोनाल्ड ट्रम्प यांनी वीटोचा अधिकार वापरला तर मात्र विरोधी पक्षाच्या अडचणी वाढू शकतात. कारण वीटो रद्द करण्यासाठी दोन तृतिआंश मतदानाची गरज असणार आहे, जे की सध्या जवळपास अशक्य मानलं जातं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 107 स्टोरी, 7,891 फॉलोअर्स; आता संगीता चांदगुडे यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटची चर्चा, अनेक पोस्ट एकाच विषयावर
  • तीन नवजात बालकांचा मृत्यू, आमदार रवी राणा यांचा डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप..
  • 86 हजार 622 कोटींचं बिल थकीत, कंत्राटदार आर्थिक अडचणीत; शिवतीर्थावर घेणार राज ठाकरेंची भेट
  • IND vs SL: यशस्वी जयस्वालचा माज खपवून घेतला जाणार नाही, भारतीय कोचकडून थेट वॉर्निंग
  • Drishyam 3: विजय साळगावकरचा शेवटचा डाव, अजय देवगणचा ‘दृश्यम: द कन्क्लुजन’; दोन भागांनी वाढवलेलं गूढ आता संपणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in