• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! ठाण्यात इमारतीचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू, अनेकजण जखमी

July 10, 2026 by admin Leave a Comment


ठाण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. आझाद नगर परिसरातील मद्रास चाळ येथील चाळीतील पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा भाग कोसळला आहे. हे 25 ते 30 वर्ष जुने बांधकाम आहे. या घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला असून दोन ते तीन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एक महिला व दोन लहान मुलांचा समावेश आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

ठाण्यात चाळीचा भाग कोसळला

मद्रास चाळ येथील चाळीतील पहिल्या मजल्यावरील काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व आपत्कालीन विभाग अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमींना बाहेर काढून खाजगी रुग्णालयात दाखल केले आहेत. सध्या त्यांचे प्रकृती स्थिर असल्याचा प्रशासनाच्या वतीने सांगितले आहे. सतत पडलेल्या मुसळधार पावसामुळे ही घटना घडली आहे. या घटनेतील मुलाचे नाव जय जयस्वाल असून तो 12 वर्षांचा आहे.

मानखुर्दमध्ये इमारत कोसळून मोठी जीवितहानी

मानखुर्दच्या जनतानगरमध्ये 3 मजली घर कोसळल्याची घटना घडली होती. घटनेची माहिती मिळतात NDRF, अग्निशमन दल, पोलीस आणि BMC कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं. या दुर्घटनेत 6 बालकांसह 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तसेच अनेकजण जखमी झाले होते. तसेच मुंबईत काही ठिकाणी झाडे कोसळून काही नागरिकांचा मृत्यू झाला होता.

मोशीत एकाचा मृत्यू, अनेकजण अडकले

मोशी येथील या घटनेत 20 पेक्षा जास्त लोक इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते, यातील काही जणांना वाचवण्यात यश आले आहे, तर काहीजणांचा शोध अजूनही सुरू आहे. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. 48 तासांहून अधिक काळ उलटल्यानंतरही ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सात ते आठ जणांचा अद्याप शोध लागलेला नाही. यामुळे अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचा संताप आणि आक्रोश वाढू लागला आहे. मात्र मोठ्या प्रमाणात कचरा आणि मातीचा ढिगारा असल्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. या घटनेत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in