
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी देखील अनेकदा बोलताना ऑपरेशन टायगरचा उल्लेख केला आहे. मध्यंतरी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संर्पकात असल्याचा दावा केला जात होता. या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी खासदारांची बैठक बोलावली आहे. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. येत्या 14 जून रोजी उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी खासदारांची बैठक बोलावली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या खासदाराची बैठक बोलावल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
येत्या 14 जून रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही खासदारांची बैठक होणार आहे. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. मध्यंतरी शिवसेना ठाकरे गटाचे खसादार हे एकनाथ शिंदे यांच्या संर्पकात असल्याचा दावा केला जात होता. नागेश पाटील आष्टीकरांनी देखील एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, तर खासदार संजय पाटील यांच्या पत्नीच्या तब्यची विचारपूसही एकनाथ शिंदेंकडून करण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्वा प्राप्त झालं आहे.
Leave a Reply