• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! टीईटी पेपरफुटीतील मुख्य आरोपी अटक, तब्बल..

July 25, 2026 by admin Leave a Comment


नीट पेपरफुटीचा मुद्दा देशभरात गाजत आहे. जंतर मंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टी जंतर मंतरवर आंदोलन करत आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. सरकारकडून संसदेत विधयेयक पेपरफुटीच्या मुद्द्यात आणला जात आहे. कडक कायदा याबाबत केला जाईल. काल शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये चर्चा झाली. कॉकरोच जनता पार्टीच्या एकून 3 मुख्य मागण्या आहेत. त्यापैकी 2 मागण्या सरकारने मान्य केल्या. तिसरी सर्वात महत्वाची मागणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आहे. धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट शिष्टमंडळाने केले. आज पुन्हा एकदा बैठक शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये होणार आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सरकारने आजपर्यंतचा वेळ मागितला होता.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक आक्रमक आहेत. जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. देशभर या आंदोलनाची व्याप्ती वाढली आहे. गैरप्रकार रोखण्याबाबतचे सध्याचे कायदे अधिक कडक केले जातील. संसदेत हा विधेयक सरकार मांडणार आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. विद्यार्थ्यांसोबत व्हिडीओच्या माध्यमातून नरेंद्र मोदी संवाद साधताना दिसले.

फक्त नीट परीक्षेचा पेपरच नाही तर राज्यातील टीईटी परीक्षेचाही पेपर फुटला आहे. टीईटी पेपर फुटीतील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली. अखेर टीईटी पेपर फुटीतील मुख्य आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश मिळाले. वीरेंद्र कुमार असे या आरोपीचे नाव असून त्याला बिहारमधून अटक करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून पोलिस याच्या माघावर होती.

पोलिस आता गुप्ताला भिवंडीत घेऊन येणार आहेत. टीईटी परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत तब्बल 12 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आले. सध्या यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. देशभरात पेपरफुटीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामध्येच आता याविरोधात कडक पाऊले सरकारकडून उचलली जात आहेत. मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. टीईटी पेपरफुटीतही एका मागून एक धक्कादायक खुलासे होत आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in