• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! खासदार फुटणार? आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; काल सर्वजण…

June 15, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षाचे अनेक खासदार नाराज असल्याचे समोर आले आहेत. काल झालेल्या बैठकीला सर्व 9 खासदार हजर होते, यातील काही खासदार ऑनलाईन तर ऑफलाईन हजर होते. मात्र यातील काही खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशातच आता या सर्व प्रकरणातवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अफवांवर विश्वास ठेऊ नका असं आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

शिवसेना खासदार नाराज असल्याची चर्चा सुरू असताना आज आमदार आदित्य ठाकरे यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘अफवांवर विश्वास ठेऊ नका, काल सर्वजण बैठकीला हजर होते. कोणीही नाराज नाही. जो आमच्या सोबत, त्यांच्यावर आम्ही अंधविश्वास ठेवतो. कोणीही नाराज नाही.’

ठाकरेंचे 7 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात

शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी मोठं विधान केलं आहे. तुमाने म्हणाले की, ‘उबाठामध्ये फारच असंतोष आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर सात खासदारांचा विश्वास आहे. त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर एकनाथ शिंदे सारखा कर्तव्यनिष्ठ नेता समाजाला न्याय देऊ शकतो असा त्यांना विश्वास आहे. त्यामुळे लवकरच ऑपरेशन टायगर यशस्वी झालं याची बातमी मिळेल. चर्चा सुरू नाही तर सर्वकाही ठरलं आहे. सर्व चौकशी झाली आहे. फक्त लवकरच ऑपरेशनची तारीख बाकी आहे. लवकरच ऑपरेशन टायगर यशस्वी झालं याची बातमी मिळेल.’

खासदार का नाराज?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाचे काही खासदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे खासदारांना भेटत नाहीत, या खासदारांना मदत केली जात नाही. खासदार भेटायला गेल्यास त्यांची भेट न घेता उद्धव ठाकरे विरोधी नेत्यांना भेटत असल्याने खासदारांनी नाराजी व्यक्त केली असून हे खासदार बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ENG vs NZ : तिसरा आणि अंतिम कसोटी सामना, कोण जिंकणार मालिका? गुरुवारपासून थरार
  • INDW vs BANW Live Streaming : भारत-बांगलादेशसाठी निर्णायक सामना, किती वाजता सुरुवात होणार?
  • आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडीतील नेत्यांना दोन सवाल, बैठकीत काय काय घडलं?
  • Odi Ranking : आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारताचा दबदबा, रोहित कितव्या स्थानी?
  • Ketan Murder Case: अत्यंत धक्कादायक, धक्का देण्यापूर्वी सियाने केले ते क्रूर कृत्य… नाहीतर वाचला असता केतन? त्या जवळच्या व्यक्तीचा दावा काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in