• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी….

July 27, 2026 by admin Leave a Comment


NEET पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर आता आंदोलनकर्त्यांना कायदेशीर मदत देण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आंदोलनातील प्रमुख अभिजीत दीपके आणि सौरव दास यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत महत्त्वाची भूमिका मांडली.

कपिल सिब्बल यांनी शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई होऊ नये, अशी मागणी केली. आंदोलनादरम्यान किंवा त्यानंतर देशातील कोणत्याही राज्यात विद्यार्थ्यांवर FIR दाखल झाल्यास त्यांना कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. यासाठी देशभरातील वकिलांना एका संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहनही करण्यात येणार आहे.

यावेळी कपिल सिब्बल यांनी सर्वात मोठी घोषणा करत, विद्यार्थी आंदोलनासाठी कायदेशीर मदतीसाठी स्वतः 1 कोटी रुपये देणार असल्याचे सांगितले. हा निधी केवळ लीगल हेल्पसाठी वापरला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच इतरांनीही या उपक्रमाला आर्थिक मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in