
ओबीसी समाजाच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. राज्यभरातून ओबीसी समाजाचे बांधव 1 सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी येणार होते. मात्र, आझाद मैदान पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी देण्यास नकार दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलनासाठी मल्लिकार्जुन पुजारी यांच्या नावाने पोलिसांकडे परवानगीचा अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी विविध कारणांचा हवाला देत आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.
रुग्णालयांसह वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता
मुंबई पोलिसांनी दिलेल्या कारणांमध्ये आझाद मैदानाच्या आसपास असलेल्या रुग्णालयांच्या व्यवस्थेवर आंदोलनाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाल्यास मुंबईची वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ शकते, अशी शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे. याशिवाय आंदोलनामुळे परिसरात निर्माण होणारी गर्दी, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आणि नागरिकांना होणारा संभाव्य त्रास यासह इतर कारणांचा विचार करून परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply