• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी घेतली CM फडणवीसांची भेट, नेमकं कारण काय?

August 12, 2026 by admin Leave a Comment


राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांनी जवळपास 20 मिनिटे चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबाबत अद्याप समजलेले नाही. मात्र राज्याच्या राजकारणात या भेटीची चर्चा रंगली आहे.

सर्वोच्च न्यायालयात सध्या शिवसेना कुणाची याबाबत सुनावणी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून गेल्या 4 दिवसांपासून जोरदार युक्तिवाद केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या भेटीत काही चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्नही गेल्या काही काळापासून प्रलंबित आहे. त्यामुळे याबाबतही या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आज सुप्रीम कोर्टात काय घडलं?

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली. आज सिब्बल यांनी कोर्टात निवडणूक आयोगाने नियमांची पायमल्ली करून कशा पद्धतीने शिंदेंच्या शिवसेनेला मान्यता दिली याबाबत युक्तिवाद केला. एकनाथ शिंदे यांचे मुख्यनेतेपद आणि उपमुख्यमंत्रीपद घटनाबाह्य असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत यांनी सुनावणीनंतर बोलताना म्हटले की, ‘आज सलग चौथ्या दिवशी कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. पक्ष आणि चिन्हाबाबत भूमिका मांडली. युक्तिवाद जोरदार चालला आहे. निवडणूक आयोगाने सुनावणी न घेता एका फुटीर गटाला पक्ष आणि चिन्ह म्हणून मान्यता दिली ते किती बेकायदेशीर आहे. पश्र संघटना फुटलेली नाही, विधिमंडळ फक्षातील फूट म्हणजे पक्षातली फूट नाही. याच्यावर आज युक्तिवादाचा जोर होता. न्यायमूर्तींनी काही प्रश्न विचारले, सिब्बल यांच्या मनात काही भूमिका होत्या त्या त्यांनी मांडल्या आहेत. आज सिब्बल यांनी उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख असलेल्या शिवसेनेची बाजू मांडली.’

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MPSC Paper Leak : लव्ह स्टोरीमुळे फुटला MPSC चा पेपर, तपासातून धक्कादायक माहिती समोर
  • Khavdya Donger : खवड्या डोंगर प्रकरणात हैराण करणारा ट्विस्ट, कुणालला जीव द्यायचाच नव्हता? मोठं कारण आलं समोर
  • मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, सर्वात मोठा बदल घडणार?
  • Tukaram Mundhe: रेस्टॉरंटमध्ये पोहोचताच मित्रांनी काढला तुकाराम मुंढेंचा फोटो; पुढे जे केलं ते पाहून हसू आवरणार नाही
  • मोठी बातमी! महाराष्ट्र ड्रग इंस्पेक्टर परीक्षा रद्द, पेपर लीकचा आरोप झाल्यानंतर मोठा निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in