• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?

August 12, 2026 by admin Leave a Comment


बीडच्या इमामपूर रोड परिसरात रात्रीच्या सुमारास गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेवेळी सुमारे ३० ते ३५ जणांची टोळी उपस्थित होती. याच वादातून वाल्मिक कराड समर्थक सफान खान याने चार राऊंड फायर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी चार जणांसह काही अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच बीड पोलिसांनी तपास सुरू केला असून, गोळीबारामागील नेमके कारण आणि घटनेतील आरोपींची भूमिका याबाबत अधिक तपास केला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून पुढे कोणती कारवाई केली जाते, आरोपींना अटक होते का आणि गोळीबारासाठी वापरण्यात आलेले शस्त्र जप्त केले जाते का, याकडे आता लक्ष लागले आहे. पोलिसांच्या तपासातून या संपूर्ण घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Jayant Patil: पक्ष बदलाच्या चर्चा अन् भर सभेत जयंत पाटील यांचे बेधडक उत्तर, म्हणाले…
  • Dharashiv Politics : ओमराजे निंबाळकरांनी पक्ष बदलताच गेम फिरला, धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नगरसेवक फुटले
  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in