• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा, सरकारचं टेन्शन वाढणार? येत्या 15 ऑगस्टला आता थेट…

August 10, 2026 by admin Leave a Comment


नीट पेपर परीक्षा फुटीनंतर देशभरात वातावरण चांगलंच तापलं होतं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सीजेपी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीच्या जंतर -मंतर मैदानावर सीजेपच्या वतीने जवळपास महिनाभर आंदोलन सुरू होतं. आंदोलकांनी संसदेवर देखील मोर्चा काढला. या मोर्चाला हिंसक वळण लागलं. दरम्यान त्यानंतर अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता अभिजीत दिपके यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी  आपला मोर्चा सरकारी शाळांकडे वळवला आहे.

अभिजीत दिपके यांनी आता आपला मोर्चा राज्यातील सरकारी शाळांकडे वळवला आहे.  सरकारी शाळा चांगल्या करण्याची दिपके यांच्याकडून सरपंचांना विनंती करण्यात आली आहे. येत्या 15 ऑगस्टपासून सरकारी शाळांच्या सुविधा व किक्षणाबाबत अभिजीत दिपके यांच्याकडून मोहीम राबवण्यात येणार आहे.  स्वतः हिंगोलीला जाऊन गावची शाळा दुरुस्त करण्याची सरपंचांना विनंती करणार, असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

नेमकं काय म्हणाले अभिजीत दिपके? 

15 ऑगस्टला आपला 80 वा स्वतंत्र दिवस आहे. 80 वर्षात सगळ्यात जास्त दुर्लक्षित काय झालं असेल तर ती म्हणजे गावातील सरकारी शाळा. 80 वर्ष झाले मात्र ज्या गावात शाळा आहेत त्यावर थोडं सुद्धा काम केलं नाही. आपण नवीन संसद तयार केली, पंतप्रधानांसाठी नवीन घर तयार केलं, परंतु नवीन शाळा तयार केल्या नाहीत. गावातल्या शाळेत जे शेतकऱ्यांचे मुलं शिक्षण घेतात त्यांना तुम्ही देशाचे भवितव्य मानत नाहीत का? असा सवाल यावेळी अभिजीत दिपके यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की? मोठ्या शहरात मिळणाऱ्या सुविधा आतापर्यंत आपण का त्यांना देऊ शकलो नाहीत? शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांवर पायपीट करण्याची वेळ येते. शाळेत पाण्याची सोय नसते, टॉयलेटची सोय नसते. लहान मुलांना अनेक अडचणी येतात.  जर आपल्याला कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायचं असेल तर ते सरकारी शाळांवर देण्याची गरज आहे. त्यामुळे येत्या 15 ऑगस्टपासून मोहीम सुरू करत आहोत, अशी घोषणा दिपके यांनी केली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in