• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे… शरद पवारांनी एका वाक्यातच सांगितलं, आमचा…

June 25, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांनी बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गटासाठी पत्रही दिले आहे. खासदारांनंतर आता ठाकरे गटातील काही आमदारही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. त्यामुळे ठाकरे गटाने आमदारांची तातडीची बैठक बोलावण्याची तयारी सुरू केली आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटही अलर्ट मोडवर गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार आणि खासदार बंडखोरीच्या तयारीत असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. यावर आता पहिल्यांदाच शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, “आमचा एकही आमदार कुठे जाणार नाही.” यावेळी त्यांच्या सोबत युगेंद्र पवार देखील होते. शरद पवार यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • NCERT Portion | 1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
  • Narsapur case: तुला काय शिक्षा देऊ तूच सांग? कोर्ट संतापलं; नरसापूर प्रकरणात थेट आरोपीलाच विचारणा
  • ‘गरीब बापाने काय करायचं?’ निखिल चव्हाणला लग्नात सासऱ्यांनी दिली महागडी गाडी? फोटोवरून संतापले नेटकरी
  • Shivsena | आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू; खासदार संजय जाधवांचं मोठं विधान; नेमकं काय म्हणाले?
  • Nasrapur case | मृत्युदंड की जन्मठेप… वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in