• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी चिंता! मराठवाड्यात खरीप पेरणीचा वेग मंदावला, पावसाच्या खंडामुळे शेतकरी संकटात, कुठे किती टक्का?

July 14, 2026 by admin Leave a Comment


ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी टीव्ही 9 मराठी : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामातील पेरणीची स्थिती दिवसेंदिवस अधिक चिंताजनक बनत आहे. जुलै महिना अर्धा संपत आला असतानाही विभागात केवळ 65% पेरणी पूर्ण झाली आहे. पावसाच्या दीर्घ खंडामुळे अनेक भागांतील शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत, तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकटही निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी याच दिवशी 45.58 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, तर यंदा ती केवळ 32.15 लाख हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. सर्वाधिक पेरणी नांदेड 78% जिल्ह्यात झाली असून, लातूर 43%, धाराशिव 48% आणि बीड 62% या जिल्ह्यांमध्ये पेरणी सर्वात कमी झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

मराठवाडा विभाग पेरणी अहवाल

मराठवाड्यात खरीप पेरणी केवळ 65 टक्के

सरासरी पेरणी क्षेत्र : 49 लाख 72 हजार 729 हेक्टर

प्रत्यक्ष पेरणी : 32 लाख 15 हजार 255 हेक्टर

मागील वर्षी याच दिवशी पेरणी : 45 लाख 58 हजार 415 हेक्टर

छत्रपती संभाजीनगर विभागात पेरणी : 67 %

छत्रपती संभाजीनगर : 70 %

जालना : 70 %

लातूर विभागात पेरणी : 63 %

परभणी : 70 %

नांदेड जिल्हा आघाडीवर : 78 %

हिंगोली : 76 %

धाराशिव : 48 %

लातूर सर्वात मागे : 43 %

मराठवाड्यात पावसाची प्रतिक्षा

मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम असून जुलै महिना अर्धा संपत आला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. 13 जुलैपर्यंत विभागात सरासरी केवळ 163.7 मिमी पाऊस झाला असून तो सरासरीच्या 77.2 टक्के इतकाच आहे. जून ते सप्टेंबर या संपूर्ण हंगामाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ 24.1 टक्के पाऊस नोंदवला गेला आहे. यामुळे खरीप पिकांसह शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्हानिहाय पाहिल्यास जालना जिल्ह्यात सर्वाधिक 214.9 मिमी पाऊस झाला असून तो सरासरीच्या 106.2 टक्के आहे. तर लातूरमध्ये केवळ 119.4 मिमी पाऊस झाला असून तो सरासरीच्या 55.8 टक्के इतकाच आहे. नांदेड, परभणी, बीड, धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यांतही सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

मराठवाड्यातील जिल्हा निहाय पाऊस

छत्रपती संभाजीनगर : 184.9 मिमी (97.8%)

जालना : 214.9 मिमी (106.2%)

बीड : 150.5 मिमी (82.7%)

लातूर : 119.4 मिमी (55.8%) (सर्वात कमी)

धाराशिव : 156.2 मिमी (84.7%)

नांदेड : 171.4 मिमी (66.5%)

परभणी : 133.3 मिमी (56.2%)

हिंगोली : 181.0 मिमी (68.1%)

मराठवाड्यातील पावसाची स्थिती

मराठवाड्यात अपेक्षित पाऊस : 212.1 मिमी

प्रत्यक्ष पाऊस : 163.7 मिमी

सरासरीच्या तुलनेत : 77.2%

पावसाची तूट : 22.8%

मराठवाड्यात पावसाची मोठी तूट 

मराठवाड्यात पावसाची 22.8% तूट; जुलै अर्धा संपूनही समाधानकारक पाऊस नाही

13 जुलैपर्यंत विभागात केवळ 163.7 मिमी (77.2%) पावसाची नोंद

लातूरमध्ये सर्वात कमी 119.4 मिमी पाऊस; खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली

कृषी विभागाचा शेतकऱ्यांना काय सल्ला

छत्रपती संभाजीनगर विभागात जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. एकूण पेरणी योग्य क्षेत्र 21 लाख 47 हजार हेक्टर आहे. त्याच्यापैकी आज रोजी 14 लाख 32 हजार हेक्टर पेरणी झाली आहे. ती 67 टक्के आहे. आता पावसाचा खंड पडला आणि घराच्या विकासाच्या पुढील चार-पाच दिवस पाऊस पडेल असावेत शाळेचा अंदाज नाही. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी चांगले आहेत त्यांनी आंतरमशाळा मात्र ज्या जमिनी हलक्या आहेत त्या शेतकऱ्यांनी सावध राहण्याची गरज आहे. जिथे पाणी उपलब्ध आहे ते पाण्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून पिक कशा पद्धतीने याचा विचार केला पाहिजे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी केले.

आज दुबार पेरणीची माझ्याकडे काही रिपोर्टिंग नाही, भविष्यातील चार-पाच दिवस आपल्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. मागच्या वर्षी हलक्या जमिनीवरील सोयाबीन आणि कापूस या पिका संदर्भात आपल्याला खूप सावध राहावं लागणार आहे असा इशारा सुनील वानखेडे यांनी दिला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in