• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मॅच सुरू असतानाही..; संदिप पाटील यांच्याकडून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’चं तोंडभरून कौतुक

July 11, 2026 by admin Leave a Comment


सोनी मराठी वाहिनीवरील  प्रेक्षकांचा लाडका विनोदी कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गेली अनेक वर्षे महाराष्ट्राला मनमुराद हसवत आहे. दर्जेदार विनोद कलाकारांची अफलातून सादरीकरणं आणि प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांशी जुळलेली नाळ यामुळे हा कार्यक्रम आज घराघरातील आवडीचा ठरला आहे.

सोनी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांचा लाडका विनोदी कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गेली अनेक वर्षे महाराष्ट्राला मनमुराद हसवत आहे. दर्जेदार विनोद, कलाकारांची अफलातून सादरीकरणं आणि प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांशी जुळलेली नाळ यामुळे हा कार्यक्रम आज घराघरातील आवडीचा ठरला आहे.

याच लोकप्रियतेची प्रचिती आगामी सोमवारच्या विशेष भागात पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. भारतीय क्रिकेटविश्वातील दिग्गज संदीप पाटील त्यांचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध अभिनेते चिराग पाटील तसेच नात रियाना पाटील अशा तीन पिढ्या एकत्र 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

याच लोकप्रियतेची प्रचिती आगामी सोमवारच्या विशेष भागात पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. भारतीय क्रिकेटविश्वातील दिग्गज संदीप पाटील, त्यांचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध अभिनेते चिराग पाटील, तसेच नात रियाना पाटील, अशा तीन पिढ्या एकत्र 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमातील भन्नाट स्किट्सचा मनमुराद आनंद घेत त्यांनी कलाकारांच्या सादरीकरणालाही भरभरून दाद दिली. यावेळी संदीप पाटील म्हणाले माझी खूप दिवसांपासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या सेटवर येण्याची इच्छा होती. आज ती इच्छा पूर्ण झाली याचा खूप आनंद आहे. आम्ही घरी आवर्जून आणि नियमितपणे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पाहतो. कार्यक्रमातील अनेक स्किट्स मला इतकी आवडतात की ती अक्षरशः पाठ झाली आहेत.

कार्यक्रमातील भन्नाट स्किट्सचा मनमुराद आनंद घेत त्यांनी कलाकारांच्या सादरीकरणालाही भरभरून दाद दिली. यावेळी संदीप पाटील म्हणाले, “माझी खूप दिवसांपासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या सेटवर येण्याची इच्छा होती. आज ती इच्छा पूर्ण झाली, याचा खूप आनंद आहे. आम्ही घरी आवर्जून आणि नियमितपणे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पाहतो. कार्यक्रमातील अनेक स्किट्स मला इतकी आवडतात की ती अक्षरशः पाठ झाली आहेत.”

ती स्किट्स मी इतक्या वेळा पाहिली आहेत. एकीकडे जर क्रिकेटची मॅच सुरू असेल आणि दुसरीकडे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सुरू असेल तर माझं संपूर्ण लक्ष 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'कडेच असतं. एवढा हा कार्यक्रम मला आवडतो. सुनील गावसकर दिलीप वेंगसरकर आणि बलविंदर संधू यांच्यासोबतच मराठी न समजणारे आमचे अनेक मित्रही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आवर्जून पाहतात. हा कार्यक्रम भाषेच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाला मनापासून हसवतो हीच त्याची खरी ताकद आहे अशा शब्दांत त्यांनी कौतुक केलं.

ती स्किट्स मी इतक्या वेळा पाहिली आहेत. एकीकडे जर क्रिकेटची मॅच सुरू असेल आणि दुसरीकडे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सुरू असेल, तर माझं संपूर्ण लक्ष 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'कडेच असतं. एवढा हा कार्यक्रम मला आवडतो. सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर आणि बलविंदर संधू यांच्यासोबतच मराठी न समजणारे आमचे अनेक मित्रही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आवर्जून पाहतात. हा कार्यक्रम भाषेच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाला मनापासून हसवतो, हीच त्याची खरी ताकद आहे,” अशा शब्दांत त्यांनी कौतुक केलं.

एका कार्यक्रमाने तीन पिढ्यांना एकत्र आणत दिलेला आनंद आणि त्याच्याशी निर्माण झालेलं भावनिक नातं या विशेष भागातून अनुभवायला मिळणार आहे. संदीप पाटील चिराग पाटील आणि चिमुकली रियाना यांनी कलाकारांसोबत घालवलेले आनंदाचे क्षण आणि हास्याने भरलेले वातावरण या भागाला आणखी खास बनवणार आहे.

एका कार्यक्रमाने तीन पिढ्यांना एकत्र आणत दिलेला आनंद आणि त्याच्याशी निर्माण झालेलं भावनिक नातं या विशेष भागातून अनुभवायला मिळणार आहे. संदीप पाटील, चिराग पाटील आणि चिमुकली रियाना यांनी कलाकारांसोबत घालवलेले आनंदाचे क्षण आणि हास्याने भरलेले वातावरण या भागाला आणखी खास बनवणार आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in