• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मृणाल ठाकूर 10 वर्षांनी लहान क्रिकेटरला करतेय डेट? व्हायरल व्हिडीओनंतर सोडलं मौन

August 9, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वाचं नेहमीच खूप जवळचं नातं राहिलं आहे. आजवर अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटर्ससोबत लग्न केलं आहे, तर अनेकांचं क्रिकेटविश्वातील खेळाडूंसोबत नाव जोडलं गेलं आहे. यात आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून मृणाल ठाकूर आहे. मृणालचं नाव भारतीय क्रिकेट संघातील यशस्वी जयस्वालशी जोडलं जात आहे. यामागचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी मृणाल आणि यशस्वी यांना मुंबईतील एकाच कॅफेमधून बाहेर पडताना पाहिलं गेलं होतं. जरी हे दोघं एकत्र दिसले नसले तरी एकाच कॅफेमध्ये गेल्याचे त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तेव्हापासूनच मृणाल आणि यशस्वी यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर अखेर मृणालनेच मौन सोडलं आहे.

काय म्हणाली मृणाल?

आता सोशल मीडियावर मृणालच्या प्रोफाइलवरील एक कमेंट तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने डेटिंगच्या चर्चांवर थेट प्रतिक्रिया दिली आहे. या कमेंटमध्ये मृणालने लिहिलंय, ‘भावा शांत हो.. एकत्र कुठे, दाखवा मला. कसे यार.. तुम्ही लोकं इतके सुशिक्षित असूनही अशा अफवांना खरं कसं मानू लागता? या देशात काय काय घडतंय. जेन-झींकडून काहीतरी शिका आणि योग्य मुद्द्यांवर व्हिडीओ बनवा. त्याने उलट जास्त व्ह्यूज मिळतील.’

मृणालची कमेंट-

मृणाल ठाकूर आणि क्रिकेटर यशस्वी जयस्वाल यांच्या वयात जवळपास 9 ते 10 वर्षांचं अंतर आहे. मृणाल 34 वर्षांची आहे, तर यशस्वी 24 वर्षांचा आहे. मृणालचं नाव याआधी दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषसोबतही जोडलं गेलं आहे. इतकंच नव्हे तर हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत, अशीही चर्चा होती. तेव्हासुद्धा दोघांच्या जवळच्या व्यक्तींनी या चर्चा खोट्या असल्याचं स्पष्ट केलं होतं.

धुळ्याच्या मृणालने टेलिव्हिजनपासून करिअरची सुरुवात केली होती. ‘कुमकुम भाग्य’ या गाजलेल्या मालिकेत तिने काम केलं होतं. त्यानंतर तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. मृणाल ठाकूरने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत चांगलंच नाव कमावलंय. ‘सीतारामम’, ‘नाना’, ‘जर्सी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने विशेष छाप सोडली. करिअरच्या सुरुवातीला मृणाल एका लेखकाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. शरद चंद्र त्रिपाठी असं त्या लेखकाचं नाव असून या दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केलं होतं. मृणाल आणि शरदचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. कारण या दोघांना त्यांच्या रिलेशनशिपसाठी कुटुंबीयांची परवानगी मिळत नव्हती. अखेर शो संपल्यानंतर त्यांची जोडीसुद्धा तुटली. दोघांना वेगवेगळा मार्ग स्वीकारला.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sugar Price Today : दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय…
  • शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आधार व्हेरिफिकेशन कसं करायचं? कोणती कागदपत्रे लागतात?
  • CJP Delhi Protest : ‘कॉकरोच’ पुन्हा दिल्लीत धडकणार, 5 सप्टेंबरला…सीजेपीची मोठी घोषणा; नवं आंदोलन पेटणार?
  • सरकारने अचानक घेतला मोठा निर्णय, साखरेच्या भाववाढीनंतर आता…चार वर्षांनी काय घडलं?
  • अभिजीत दिपके यांचा लेटरबॉम्ब! काय केल्या मागण्या? टेन्शन वाढलं, आता कुणाचा राजीनामा घेणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in