• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुलगी म्हणेल थँक्यू यू बाबा! लाडक्या राजकुमारीसाठी जबरदस्त बचत योजना

August 11, 2026 by admin Leave a Comment


वाढती महागाई पाहता, मुलीच्या जन्माबरोबरच तिच्या नावावर विविध योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करणे आवश्यक आहे. जर तुम्ही 1 वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक वयाच्या मुलीच्या भविष्यासाठी गुंतवणूक करू इच्छित असाल तर हे तीन पर्याय चांगले ठरू शकतात. या पर्यायांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही मुलीचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू शकतात. कारण या योजनांमध्ये गुंतवणुकीवर परताव्याची हमी मिळते. या योजनांमध्ये मोठी जोखमी नसते. त्यातील काहींना सरकारची सुरक्षा आहे. बचत योजनांमध्ये सुकन्या समृद्धी योजना अत्यंत लोकप्रिय आहे. तर त्यासोबत इतर दोन पर्यायांमध्ये गुंतवणुकीची सुरुवात केली जाऊ शकते.

1 वर्षाच्या मुलीसाठी या 3 सरकारी योजना गुंतवणुकीसाठी योग्य ठरतात

1. सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजना अत्यंत लोकप्रिय आहे. या योजनेत 10 वर्षांपर्यंतच्या मुलीच्या नावे गुंतवणुकीची सुरुवात करता येते. मुलीचे आई-वडील वा पालक सलग 15 वर्षे या योजनेत गुंतवणूक करता येते. यामध्ये किमान 250 रुपयांची गुंतवणूक करता येते तर कमाल 1,50,000 रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते.

या योजनेत सध्या वार्षिक 8.2% दराने व्याज दिले जाते. जेव्हा मुलीचे वय 18 वर्षे होते. जेव्हा ती इयत्ता दहावी उत्तीर्ण होते. तेव्हा तिच्या खात्यातून जमा रक्कमेतून 50% पैसे काढता येतात. मुलगी 21 वर्षांची झाल्यावर तिचे उच्च शिक्षण, विवाह आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी संपूर्ण रक्कम काढता येते.

2. NPS वात्सल्य योजना

या योजनेत पालक अल्पवयीन मुलगा, मुलीच्या नावे गुंतवणुकीस सुरुवात करू शकतो. यामध्ये वार्षिक किमान 250 रुपयांची गुंतवणूक करणे अनिवार्य आहे. जेव्हा मुलगी अथवा मुलगी 18 वर्षांची होते. तेव्हा एनपीएस वात्सल्य योजना ही एनपीएस योजनेत परावर्तीत होते आणि अटी-शर्तीनुसार लाभ मिळतो.

3. पब्लिक प्रोव्हिडेंट फंड

आई-वडील लहान मुलांच्या नावे पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात. या योजनेत मुलांच्या नावे गुंतवणूक करण्यासाठी किमान वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. म्हणजे जन्मानंतर लागलीच तुम्ही मुलांच्या नावे या योजनेत गुंतवणूक करू शकतात. मुलगा-मुलगी 18 वर्षाचा होत नाही, तोपर्यंत या खात्याचे नियोजन आई-वडीलांकडून करण्यात येते. त्यानंतर खाते संबंधित खातेदाराच्या नावे होते. या योजनेत किमान 500 रुपये वार्षिक आणि कमाल गुंतवणूक रक्कम 150000 रुपये वार्षिक अशी आहे.

डिस्क्लेमर: माहिती आधारे हा लेख देण्यात आला आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी अर्थ तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्या.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Flood: चीन तिथे पोहोचला जिथून महाप्रलय सुरू झाला, नेमकं काय घडलं?
  • Khawdya Dongar: कुणालची फक्त एकच मागणी होती, पण मुरलीकाका… अखेर बहिणीने बोलून दाखवलं माहित नसलेले सत्य
  • Nepal Floods : नेपाळच्या महाप्रलयातील थरकाप उडवणारा इमिग्रेशन सेंटरचा VIDEO, सद्गुरुंचे 77 अनुयायी कुठे?
  • झोप उडवणारी बातमी… नेपाळमध्ये पुन्हा महाजलप्रलय? 47 हिमनद्या वितळण्याचा धोका
  • Abhijeet Dipke: मी अमेरिकेतून तुरुंगात जाण्यासाठीच आलो; अभिजीत दीपकेंच्या नव्या वक्तव्याने वेधले लक्ष

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in