• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुकेश अंबानींना मोठा धक्का! 3 वर्षांत या अब्जाधीशांची संपत्ती सर्वाधिक वाढली

August 14, 2026 by admin Leave a Comment


भारतातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांची चर्चा होते, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम मुकेश अंबानी किंवा गौतम अदानी यांची नावे येतात. मात्र गेल्या 3 वर्षांचा विचार करता संपत्तीत सर्वाधिक वाढ होण्याच्या बाबतीत या दोन्ही दिग्गजांना आणखी एका मोठ्या उद्योगपतीने मागे टाकले आहे. हुरुन इंडियाच्या ताज्या अहवालानुसार, गेल्या तीन वर्षांत ओपी जिंदाल समूहाच्या जिंदाल कुटुंबाच्या संपत्तीत वाढ झाली आहे. आता अंबानी आणि अदानी यांसारखी मोठी नावे मागे कशी पडली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जिंदाल कुटुंबाच्या संपत्तीत विक्रमी वाढ

ओपी जिंदाल समूहाच्या चेअरपर्सन सावित्री जिंदाल आणि त्यांच्या कुटुंबाने गेल्या तीन वर्षांत कमाईचे अनेक विक्रम मोडले आहेत. ताज्या अहवालानुसार, गेल्या तीन वर्षांत जिंदाल कुटुंबाच्या एकूण संपत्तीत तब्बल 3.3 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर जिंदाल कुटुंबाची एकूण संपत्ती आता 8.02 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. स्टील, एनर्जी आणि पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रांमध्ये मजबूत पकड असलेल्या या समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली मोठी वाढ हे यामागचे प्रमुख कारण मानले जात आहे.

टक्केवारीच्या बाबतीत कोणी मारली बाजी?

टक्केवारीच्या आधारावर पाहिले, तर देशातील सर्वात मोठ्या गारमेंट निर्यातदार शाही एक्सपोर्ट्सचे मालक आहुजा कुटुंबाने सर्वांना धक्का दिला आहे. गेल्या तीन वर्षांत आहुजा कुटुंबाच्या संपत्तीत तब्बल 352 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. या जबरदस्त वाढीनंतर त्यांची एकूण संपत्ती आता 37,500 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या यादीतील दुसरे मोठे नाव गारवारे कुटुंबाचे आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांच्या संपत्तीतही तब्बल 300 टक्क्यांची वाढ झाली आहे. आता त्यांची एकूण संपत्ती 15,600 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

टॉप-5 मध्ये मुकेश अंबानी का नाहीत?

आश्चर्यकारक बाब म्हणजे, गेल्या तीन वर्षांत संपत्तीत सर्वाधिक वाढ झालेल्या उद्योगपतींच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी टॉप-5 मध्येही नाहीत. असं असलं तरी मुकेश अंबानी अजूनही भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. पण केवळ गेल्या तीन वर्षांत नव्याने जोडलेल्या संपत्तीचा विचार केला तर जिंदाल कुटुंब आणि काही इतर उद्योगसमूहांची संपत्ती वाढण्याचा वेग अंबानींच्या तुलनेत अधिक राहिला आहे.

या कुटुंबांच्या संपत्तीत वाढ का होत आहे?

भारतीय शेअर बाजारात गेल्या तीन वर्षांत झालेली तेजी हे यामागचे सर्वात मोठे कारण मानले जात आहे. जिंदाल समूहाच्या JSW Steel आणि JSW Energy सारख्या कंपन्यांनी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. याच कारणामुळे या कंपन्यांच्या मालकांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Bus Accident : भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरमध्ये घुसली, 5 ठार 20 जखमी
  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in