• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुंबईत भीषण अग्नितांडव! विलेपार्ले परिसरात इमारतीच्या 11 व्या मजल्याला भीषण आग

August 11, 2026 by admin Leave a Comment


मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. विले पार्ले पश्चिम येथील चर्च रोडजवळील एका इमारतीच्या 12 व्या मजल्याला भीषण आग लागली आहे. आगीची पातळी लेव्हल-2 असल्याची माहिती समोर आली असून ही घटना 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत कोणीही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

विले पार्ले परिसरात इमारतीला आग

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील विले पार्ले पश्चिम, चर्च रोड परिसरात एका 12 मजली इमारतीच्या 11 व्या मजल्यावर आग लागली आहे. ही आग लेव्हल-2 असल्याचे सांगितले जात आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

आगीची ही घटना ग्राउंड प्लस 12 मजली इमारतीत घडली. मुंबई अग्निशमन दलाने रात्री 10.08 वाजता या घटनेला लेव्हल-1 (किरकोळ) घोषित केले. त्यानंतर रात्री 10.16 वाजता आगीची तीव्रता वाढल्याने लेव्हल-2 (मध्यम) करण्यात आली. मुंबई अग्निशमन दलाला रात्री 10.02 वाजता आगीची माहिती मिळाली होती. त्यानंतर रात्री सुमारे 10.26 वाजता घटनेबाबत अपडेट जारी करण्यात आले.

अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस, अदानी, 108 रुग्णवाहिका सेवा आणि वॉर्ड कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान आणि इतर आपत्कालीन पथके इमारतीत बचाव व आग नियंत्रणाचे काम करत होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आगीच्या या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही. आगीचे नेमके कारण आणि झालेल्या नुकसानीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मुंबई अग्निशमन दलाचे जवान या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video
  • काळंकुट्टं पाणी… काळाने मिठी मारावी असं दृश्य, ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटर बघता बघता गेलं वाहून; Video
  • वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in