
मंगळवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियकां गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं होतं. काँग्रेसकडून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या आंदोलनानंतर राहुल गांधी आणि प्रियकां गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं, तब्बल तीन तासांनंतर त्यांची सुटका झाली. दरम्यान राहुल गांधी यांच्या या आंदोलनानंतर आता भाजप देखील चांगलंच आक्रमक झालं आहे. देशभरतात ठिकठिकाणी भाजपकडून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये वातावरण चांगलंच तापलं असून, मुंबईचे भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वात भाजपने काँग्रेसविरोधात आंदोलनाला सुरुवात केली आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply