• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुंबईत पावसाचा कहर; सर्वसामान्यांसहित सेलिब्रिटींनाही फटका, अभिनेत्रीच्या घरात शिरलं पाणी, VIDEO

July 2, 2026 by admin Leave a Comment


मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. जून महिला कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सलग 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांसहित सेलिब्रिटींनाही फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील रस्ते-नाले तुंबल्यानंतर आता सर्वसामान्यांच्या घरात पाणी शिरलं आहे. टीव्ही अभिनेत्री अशनूर कौर हिला देखील मुंबईच्या पावसाचा फटका बसला आहे. सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अभिनेत्री अशनूर कौरच्या घरात पाणी शिरलं आहे. तिने स्वत: व्हिडिओ पोस्ट घरात पाणी शिरल्याचे चाहत्यांना सांगितले.

अभिनेत्रीने व्हिडिओ पोस्ट करत घरात पाणी शिरल्याची चाहत्यांना दाखवली. तिच्या बाल्कनीमधून पाणी थेट लिव्हिग रूममध्ये शिरलं आहे. घरात पाणी शिरल्यानंतर तिच्या काम करणारा संपूर्ण स्टाफ कामाला लागला आहे. सर्व स्टाफ व्हॅक्यूम क्लिनरच्या मदतीने घरात शिरलेलं पाणी काढत आहेत. अभिनेत्री अशनूरने इन्स्टाग्राम (Instagram) स्टोरीवर व्हिडिओ शेअर करत माहिती दिली.

अभिनेत्री अशनूरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये घराच्या लिव्हिंग रुममध्ये पाणी शिरल्याचे दिसतंय. बाल्कनीतून थेट पाणी लिव्हिंग रुममध्ये येत आहे. त्यामुळे घरातील फरशीवर पाणीच पाणी दिसत आहे. घरात पाणी शिरल्यानंतर घरातील महागड्या वस्तू पाण्याने खराब होऊ नये, यासाठी संपूर्ण स्टाफ कामाला लागला आहे. या स्टाफकडून घरातील महागड्या वस्तू इतरत्र हलविल्या जात आहेत. तसेच व्हॅक्यूम क्लिनरच्या मदतीने स्टाफ पाणी काढताना दिसत आहे. या स्टाफने पावसाच्या पाण्याची एन्ट्री झाल्यानंतर घरातील कारपेट उचलून बाजूला ठेवलं.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 

अशनूरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या घरात पाणी शिरल्याने तिच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. चाहते सोशल मीडियावर कमेंट्स करत तिची आणि कुटुंबाच्या सदस्यांच्या तब्येतीची विचारपूस करत आहेत. दुसरीकडे मुंबईतील अनेक भागात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी कारवाई, दिपाली सय्यद, अंधारे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल!
  • रक्षाबंधनावर आधारित सुपरहिट गाणं, 43 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आशा भोसले यांनी दिलेला आवाज
  • Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंचा मोठ्या बैठकीपूर्वीच सरकारला थेट इशारा, म्हणाला, पुन्हा अशी चूक…
  • खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
  • ज्याची भीती होती तेच घडलं, यशस्वी जयस्वालवर ICC ची मोठी कारवाई, करिअरवर लागला डाग

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in