• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुंबईत घर खरेदी महागणार? नोंदणी शुल्काविषयी मोठी अपडेट, अशी बसणार सर्वसामान्यांच्या खिशाला झळ

July 17, 2026 by admin Leave a Comment


Mumbai Property Registration Fees: मुंबईत मालमत्ता, घर खरेदीचा विचार करत असाल तर ही महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठीच आहे. आता मालमत्ता खरेदीसाठी अतिरिक्त खर्च करावा लागू शकतो. राज्य सरकार उत्पन्न वाढीसाठी एक मोठे पाऊल टाकण्याची शक्यता आहे. सरकार मालमत्ता नोंदणी शुल्कात वाढ करण्याचा विचार करत आहे. सध्या नोंदणी शुल्क हे 30 हजार रुपये इतके आहे. ते 50 हजार रुपये करण्याची योजना आहे. नोंदणी महानिरीक्षक कार्यालयातील (Inspector General of Registration) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गेल्या 10 वर्षात मालमत्ता नोंदणी शुल्कात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. घरांच्या वाढत्या किंमती आणि महसूल वाढीसाठी हा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अद्याप अंतिम निर्णय नाही

IGR च्या वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार, या प्रस्तावावर सरकारमध्ये चर्चा झाल्याचे समजते. मात्र मालमत्ता शुल्क वाढीचा अंतिम निर्णय प्रलंबित आहे. मालमत्ता नोंदणी शुल्क सरसकट वाढवावे की त्यात श्रेणीनुसार कमी जास्त वाढ करावी यावर अद्याप खल बाकी आहे. मुंबईच्या उच्चभ्रू वसाहतींच्याच नोंदणी शुल्कात वाढ करावी याविषयीची चर्चा सुरू असल्याचे समोर आले आहे. मालमत्ता नोंदणी शुल्कात वाढ करण्याचा कोणताही अंतिम निर्णय अद्याप झाले नसल्याचे समजते.

जून महिन्यात किती मालमत्ता नोंदणी?

जून महिन्यात मालमत्ता खरेदीचा आलेख उंचावला आहे. मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्राला सुगीचे दिवस आल्याचे समोर आले आहे. मुंबई मालमत्ता नोंदणी विभागानुसार, जून 2026 मध्ये मुंबईत 13,413 मालमत्तांची नोंदणी झाली. गेल्यावर्षी जून महिन्यातील घर विक्रीच्या आकड्यांपेक्षा यंदा विक्रीत वाढ झाल्याचे दिसते. जून 2025 च्या तुलनेत गेल्या महिन्यात 1,851 अधिक मालमत्तांची नोंदणी झाली आहे.

सरकारच्या महसूलात मोठी वाढ

जून 2026 मध्ये राज्य सरकारला मुद्रांक शुल्क(Stamp Duty) आणि नोंदणी शुल्काच्या (Registration Fees) रुपाने 1,085 कोटींचा महसूल मिळाला. गेल्या वर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत त्यात 50 कोटींची अधिक भर पडली आहे. 2025 मध्ये संपूर्ण वर्षभरात मुंबईत 1,50,293 मालमत्तांची नोंदणी झाली होती. तर यावर्षी जानेवारी ते जून 2026 यामध्ये मुंबईत 80,330 मालमत्तांची नोंदणी झाली आहे.

मुंबईकरांच्या खिशावर काय परिणाम?

कोणतीही मालमत्ता खरेदी करताना, त्यात घर, बंगला, फ्लॅट, दुकान, जमीन खरेदी करताना खरेदीदाराला मालमत्ता नोंदणी शुल्क जमा करणे सक्तीचे आहे. हे शुल्क जमा केल्यानंतरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होते. खरेदीदाराच्या नावावर मालमत्ता करण्यात येते. मुंबईत मालमत्ता नोंदणी शुल्कात जर वाढ केली तर खरेदीदाराच्या खिशावर 20 हजार रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ठाणे मॅरेथॉन: विजेत्यांना मेडल न मिळाल्याने पालकांचा गोंधळ
  • Supriya Sule : चुकीच्या पद्धतीने काढून घेतलेला राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांना परत करा: सुप्रिया सुळे
  • यंदाच्या बाप्पांच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा आणि शुभ मुहूर्त
  • Paithani Saree : पैठणी साडीसाठी आता बारकोड: वस्त्रोद्योग मंत्र्यांनी दिली माहिती, फसवणूक थांबणार
  • ‘द ग्रेट खली’च्या कारला अपघात, व्हिडीओ पोस्ट करुन म्हणाला.. तुमच्या आशीर्वादाने

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in