
बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाण त्याचा खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. रिल्सच्या माध्यमातून अगदी कमी वेळात त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. मात्र, नुकताच सूरज चव्हाणने चाहत्यांबद्दल मोठे विधान केले.
सूरज चव्हाण याने म्हटले की, मी चाहत्यांना इज्जत देतो ना तर ते डोक्यावर बसतात. यावेळी सूरज चव्हाण याने एक अनुभव देखील सांगितला आहे.
सूरज चव्हाण याने नुकताच म्हटले की, माझे फॅन रात्री घरी नशा करून आले. त्यावेळी माझी बायको चिडली होती. तिने मला म्हटले की, हे तुमचे फॅन घराबाहेरच घरात नाही.
मी फॅनची इज्जत करतो. त्यांच्यामुळेच मी आहे पण मी इज्जत देतो ना तर डोक्यावर काहीजण बसतात. लग्नापूर्वी गोष्टी वेगळ्या होत्या. पण आता घरात माझ्या बायको असते.
सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या सिझनमध्ये एक जोडी कपडे आणि तुटलेली चप्पल घेऊन दाखल झाला होता.आता त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. लोकांनी त्याला प्रचंड प्रेम दिले.




Leave a Reply