
मालदीव पर्यटनासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. भारतीय लोक मोठ्या संख्येने मालदीवमध्ये जातात. मात्र, तुम्हीही मालदीवमध्ये फिरण्यासाठी जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. भारत नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने मालदीवला जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी एक निवेदन जारी केले.
जर मालदीवमध्ये जाऊन तुम्ही चूक केली तर तुम्हाला थेट जेलची शिक्षाही होऊ शकते. मालदीव सरकारने मार्च 2026 पासून ड्रग्स कायद्यात मोठा बदल केला.
या नवीन नियमानुसार, जर तुमच्याकडे ड्रग्स सापडली तर जन्मठेप होऊ शकते. जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात ड्रग्स सापडले तर तुम्हाला फाशीची शिक्षा होऊ शकते.
जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्याकडे थोडासा ड्रग्स असेल तर तुम्हाला काही होणार नाही. पण थांबा हा तुमचा खूप जास्त मोठा गैरसमज आहे. थोडा ड्रग्स सापडला तरीही तुमच्यावर कारवाई होईल.
नुकताच या प्रकरणात भारतासह अन्य देशांच्या नागरिकांवर मालदीवमध्ये कारवाई झाली. भारतीय उच्चायोग आणि एनसीबीने याबाबत पाऊले उचलली आहेत.




Leave a Reply