• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

माझ्या भावाने खूप काही सहन…, सोहेलच्या घटस्फोटावर सलमान खानने सोडलं मौन, पूर्व वहिनीवर नाराजी व्यक्त

August 3, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता सलमान खान नुकताच ‘द अलायंस’ शोमध्ये दिसला.. सलमान खान याची एन्ट्री झाल्यानंतर इतर स्पर्धक देखील चकित झाले. सर्वांना असं वाटलं की, सलमान शो होस्ट करण्यासाठी आला आहे. पण यावेळी सलमान शो होस्ट करण्यासाठी नाही तर, भाऊ सोहेल खान याला भेटण्यासाठी आला. यावेळी सलमान खान, लहान भावाच्या घटस्फोटाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे… घटस्फोटानंतर माझ्या भावाने खूप काही सहन केलं आहे…, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

सोहेल खान आणि सीमा यांच्या घटस्फोटावर सलमान याने मोठं वक्तव्य केलं आहे. शोमध्ये सलमानने सोहेल याला विचारलं, ‘अद्यापही सीमाचं ऐकतोस का?’ पुढे सलमान म्हणाला, ‘बोलायला पाहिजे, नाही बोललं पाहिजे… माझ्या प्रिय भावाने घटस्फोटाची सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली. एका भावाच्या नात्याने मला माहिती आहे, घटस्फोटादरम्यान माझ्या भावाने काय काय सहन केलं आहे… त्या प्रवासात तो प्रचंड भावूक झालेला. ते नातं टिकवण्यासाठी सोहेल याने प्रचंड प्रयत्न केलं…’ असं देखील सलमान खान म्हणाला…

सोहेल खानने स्वीकारली घटस्फोटाची जबाबदारी

कुणाल खेमू हा सोहैलला विचारतो की, पूर्व पत्नी सीमाला शोमध्ये पाहून त्याला कसं वाटतंय? त्यावर सोहैल म्हणतो, “खूपच छान वाटतंय. या सुंदर महिलेसोबत मी माझ्या आयुष्याची 25 वर्षे घालवली आहेत. मी नॅशनल टेलिव्हिजनवर हे मान्य करतो की, आमच्या नात्यात कधीही कोणतीही चूक झाली असेल, तर त्याची सर्व जबाबदारी मी घेतो.”, घटस्फोटानंतर देखील सोहेल खान खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो.

सोहेल खान आणि सीमा यांचा घटस्फोट

सीमा सजदेह आणि सोहेल खान यांनी 1998 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना योहान आणि निर्वाण ही दोन मुलं आहेत. लग्नाच्या 25 वर्षांनंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. घटस्फोटानंतर दोघं मिळून दोन्ही मुलांचं संगोपन करत आहेत. सोशल मीडियावर सीमा कायम सक्रिय असते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • टाटा मोटर्सची बंपर ऑफर! ऑगस्टमध्ये गाडी खरेदीवर मिळणार तब्बल 2.25 लाख रुपयांपर्यंतचा फायदा
  • नवीन बाईक खरेदी केल्यानंतर पश्चात्ताप नको; डिलिव्हरी घेण्यापूर्वी नक्की तपासा ‘या’ गोष्टी!
  • पावसाळ्यात वाढला आजारांचा धोका; डेंग्यू आणि स्वाइन फ्लूची लक्षणे कशी ओळखायची?
  • नवरा नक्को गं बाई! तरुण पोरी लिव्ह इनच्या प्रेमात, लग्न म्हटलं की…धक्कादायक आकडेवारी समोर!
  • ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड युजर्सना मोठा झटका ! 28 ऑगस्टपासून बदलणार लेट फी आणि रिवॉर्ड पॉईंट्सचे नियम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in