• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

माझ्या नादी लागू नका मी… सुरेश धस यांची जयंत पाटलांना मोठी धमकी, थेट आव्हान देत..

July 14, 2026 by admin Leave a Comment


आमदार सुरेश धस आक्रमक झाले असून त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांवर निशाणा साधला. जयंत पाटलांनी माझ्या नादाला लागू नये, मी सहज डिवचायचा माणूस नाही, म्हणत त्यांनी इशारा दिला. दुधाच्या दराच्या आणि इतर काही प्रश्नांवर जयंत पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात आरोप केले. या आरोपांना सुरेश धस यांनी उत्तर दिले असून थेट मोठे आव्हानच दिले. कुठे कोणाचे घोटाळे आहेत आणि ते अधिवेशनात मांडणार असल्याचेही सुरेश धसांनी म्हटले. मच्छिंद्रनाथ गडावरून बोलताना सुरेश धस यांनी म्हटले की, जयंत पाटील यांनी माझ्या नादाला लागू नये, मी सहज डिवचायचा माणूस नाही. जर मी उलटा फिरलो तर नीट सोडणार नाही. तुमची नाैटंकी आणि दादागिरी इथे चालणार नाही, बीडमध्ये.

तुम्हाला बघून लोक गप्प बसत असतील, पण आम्ही बसणार नाही. तुम्हाला जेवढे डोके दिले आहे, त्यापेक्षा एक टक्का तरी आमच्या देवाने आम्हाला जास्त दिले आहे. इथे येऊन आमच्या भागात डिवचायचे काम करता मग आम्ही तुमच्या भागात येईन डिवचू का? महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात जलसंपदा विभागाच्या कारभारावरही त्यांनी गंभीर आरोप केले.

त्या काळात कोण जलसंपदा मंत्री होते? संपूर्ण राज्याची लूट केली. पुढच्या अधिवेशनात मी हाच मुद्दा मांडणार आहे. पहिल्याच दिवशी जिओ टॅगिंगचा. महालक्ष्मी सारखी संख्या कोणाची आहे? कोणाच्या नावावर आहे. कोणाचा किती वाटा आहे आणि डायरेक्टर कोण कोण आहेत ही सगळी कुंडलीच माझ्याकडे आहे.

हे वर्ष मी येणाऱ्या अधिवेशान मांडणार आहे. सुरेश धस यांनी थेट जयंत पाटलांना आव्हान दिले. ज्यामुळे आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. आता सुरेश धस यांनी एका ज्येष्ठ नेत्याला आव्हान केले. यासोबतच सोडणार नसल्याची भाषाही केली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. आता सुरेश धस यांच्या विधानावर जयंत पाटील नक्की काय बोलतील हे पाहण्यासारखे ठरणार आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in