• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

माझ्या नातवाला मारणाऱ्याचा एन्काऊंटर करा… संतप्त आजोबाचा टाहो, जत पोलिसांवरच गंभीर आरोप काय?

June 13, 2026 by admin Leave a Comment


नातवाला मारणाऱ्या निलेश गडदे या हल्लेखोराचा एन्काऊंटर करा, असा टाहोच मयत नातवाच्या आजोबांनी फोडला आहे. घरात घुसून धमकावणाऱ्या निलेश गडदे याच्या विरुद्धची तक्रार घेण्यास जत पोलीस टाळाटाळ करत आहेत, असा गंभीर आरोपही वेदांत बंडगर याचे आजोबा बाळू बंडगर यांनी केला आहे. बंडगर यांच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. पोलीस आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत काय? असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे. आरोपीने गुन्हा केल्याचं समोर दिसत असताना गुन्हा का दाखल केला जात नाही? असा सवालही नागरिक करत आहेत.

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग येथील रेल्वेच्या मालधक्केतील ठेकेदारी आणि 10 लाखाच्या खंडणीच्या वादातून सांगलीमध्ये वेदांत बंडगर या 14 वर्षीय मुलाच्या डोक्यात गोळी घालून त्याची हत्या करण्यात आली होती. निलेश गडदे नामक सराईत गुन्हेगाराने त्याच्या साथीदारांच्या मदतीने हा खून केल्याचे आता तपासात समोर आले आहे. मालधक्क्यातील ठेकेदार बाळू बंडगर आणि त्याचा साथीदार लक्ष्मण खरातकडे संशयित हल्लेखोर निलेश गडदेने आरग येथील रेल्वेची मालधक्क्यावरील ठेका द्यावा किंवा 10 लाख रुपये खंडणी द्यावी, अशी लक्ष्मण खरात याचा घरात घुसून मागणी केली होती. याबाबतची तक्रार देण्यासाठी बाळू बंडगर त्यांचा मुलगा मारुती बंडगर आणि लक्ष्मण खरात हे तिघेही जत पोलीस ठाण्यात गेले होते. याचा राग मनात धरून निलेश गडदे व त्याच्या साथीदारांनी बाळू बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर याच्या डोक्यामध्ये गोळी झाडून त्याचा निर्घृणपणे खून केला होता, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

तर हा प्रकार घडला नसता

दरम्यान पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर हा प्रकार घडला नसता. संशयीचा हल्लेखोर निलेश गडदे याच्या विरुद्धची तक्रार घेण्यास जत पोलिसांनी टाळाटाळ केली. त्यानंतर त्याने सांगलीतील घरात घुसून नातू वेदांत बंडगर याला निलेश गडदे आणि त्याच्या साथीदारांनी गोळी घालून ठार मारल्याचा आरोप बाळू बंडगर यांनी केलाय. तसेच या भ्याड हल्ल्याचा निषेध करत त्यांनी संशयित हल्लेखोर निलेश गडदे याचा एन्काऊंटर करावा, अशी मागणी बाळू बंडगर यांनी केली आहे.

पोलिसात तक्रार

दरम्यान ज्या मालधक्क्याच्या वादातून सुरुवात झाली, त्या लक्ष्मण खरात यांच्या घरात घुसून सराईत गुन्हेगार निलेश गडदे याने धमकी दिली होती. आरग येथील मालधक्क्यावरील ठेका सोडावा, अन्यथा 10 लाख रुपयांची खंडणी द्यावी, अशी मागणी त्याने केली होती. तसेच पैसे न दिल्यास मारून टाकण्याची धमकीही पत्नी आणि मुलांसमोर दिल्याची तक्रार लक्ष्मण खरात यांनी पोलिसात केली आहे.

मंगळवारी मोर्चा

तर सांगली हमाल पंचायतनेही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. त्याच्या वादातून लहान मुलावर झालेला हल्ला अत्यंत निंदनीय असल्याचे सांगून आज सांगलीतील सर्व मालधक्क्यावरील हमालांनी काम बंद आंदोलन केले. तसेच मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचे हमाल पंचायतचे नेते विकास मगदूम यांनी सांगितले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Supriya Sule : शरद पवार पक्षाचे आमदार फुटणार का? राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अनुपस्थितीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या की..
  • एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर फसलंच होतं… देवेंद्र फडणवीस धावून आले अन्… पडद्यामागे नेमकं काय घडलं? सहाव्या खासदाराने…
  • आरारारा खतरनाक.. प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’ने कमावला तब्बल इतका नफा
  • मोठी बातमी! 5 जणांना मारलं, बॉम्ब… राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब; थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार
  • Operation Tiger | दिल्ली ते मुंबई…ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?; खासदारांच्या प्रवेशामागे भाजपच्या त्या सर्वात मोठ्या नेत्याची शिष्टाई मोलाची

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in