• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘माझ्या अंडरआर्म्सचा वास घेतो अन् बहिणीला सांगतो…’; नवऱ्याच्या घाणेरड्या सवयीला वैतागली अभिनेत्री

August 15, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान आणि इन्फ्लुएन्सर झैद दरबार यांचे लग्न झाले, तेव्हा त्यांच्या वयातील फरकामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. गौहर झैदपेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे. जेव्हा त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा लोकांनी त्यांना ट्रोल केले. सोशल मीडियावर त्यांना अनेक घाणेरड्या कमेंट्सचा सामना करावा लागला. हे कपल आता पुन्हा चर्चेत आले आहे कारण नुकतेच त्यांनी एका चॅट शोमध्ये भाग घेतला. ज्याचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या शोमध्ये गौहरने पती झैदच्या वाईट सवयबद्दल बोलून दाखवले आहे.

गौहर म्हणाली की झैदची एक वाईट सवय आहे जी मला अजिबात आवडत नाही.  आपल्या पतीच्या विचित्र सवयी आठवून सांगताना गौहर खानने सांगितले की, त्याला माझ्या अंडरआर्म्सचा वास घ्यायला आवडतो आणि इतकेच नाही तर तो त्याच्या बहिणीला तेच करायला सांगतो. त्याला वाटते की माझ्या काखेतून नेहमी ताजा वास येतो, स्वतःच्या बहिणीलाही सांगतो, ‘बघ, किती छान वास येतोय.” झैद दरबार नुकताच ‘अलायन्स’ या रिॲलिटी शोमध्ये दिसला होता.

गौहरने या चॅट शोमध्ये झैदसोबतच्या तिच्या पहिल्या भेटीची गोष्ट सांगितली. ती म्हणाली की, “कोविड-19 महामारीच्या काळात ते एका सुपरमार्केटमध्ये भेटले होते. त्यानंतर झैदने गौहरला इन्स्टाग्रामवर मॅसेज केला की “हाय, मला तुला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे.” पुढे त्या दोघांनी त्यांच्या वयातील फरकावर चर्चा केली. झैदने त्याचे वय फक्त 24-25 वर्षे असल्याचे सांगितले, ज्यानंतर गौहरने त्याला लगेच चॅट संपवण्यास सांगितले. तिने हेही उघड केले की, घाबरून झैदने त्याचे खरे वय सिद्ध करण्यासाठी थेट चॅटमध्ये त्याच्या पासपोर्टचा फोटो पाठवला, ज्यावरून तो प्रत्यक्षात 29 वर्षांचा होता आणि लवकरच तो 30 चा होणार होता. मग नंतर मी म्हटलं ठीक आहे चल आता काही होऊ शकत कारण फक्त सहा वर्षांचा फरक आहे.” याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Bus Accident : भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरमध्ये घुसली, 5 ठार 20 जखमी
  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in