• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

माजी गृहमंत्र्यांचं महिला पोलिसांसोबत गैरवर्तन, अनिल देशमुख यांच्यावर नवनाथ बन यांचा थेट आरोप

July 24, 2026 by admin Leave a Comment


Navnath Ban Blammed on Anil Deshmukh: जंतर मंतरच नाही तर मुंबईत पोलिसांनी महिलांशी, तरुणींशी गैरवर्तन केल्याचा ठपका विरोधकांकडून ठेवला आहे. महिला आंदोलकांसोबत अश्लील वर्तनाचे दावे करणारे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याचवेळी भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी माजी गृहमंत्री आणि शरद पवार राष्ट्रवादीचे बडे नेते अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील आंदोलनाचा त्यांनी उल्लेख करत देशमुखांवर विनयभंगाचा गुन्हा का दाखल होऊ नये अशी विचारणा केली आहे. बन यांनी अधिकृत एक्स हँडलवर याविषयीचा व्हिडिओही शेअर केला आहे. त्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

काय आहे गंभीर आरोप?

छत्रपती संभाजीनगर येथील एका आंदोलनाचा संदर्भ देत बन यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी याविषयीचे ट्विट त्यांच्या एक्स हँडलवरून केले आहे. त्यानुसार, “छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या आठवड्यात एका आंदोलनादरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका महिला पोलिसासोबत कसं गैरवर्तन केलं ते बघा. आता रोहित पवार, वर्षाताई गायकवाड हे अनिल देशमुख यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहेत की मूग गिळून गप्प बसणार?” असा संतप्त सवाल बन यांनी विचारला आहे.

त्या व्हिडिओत आहे तरी काय?

नवनाथ बन यांच्या दाव्यानुसार, हा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर येथील एका आंदोलनादरम्यानचा आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीने हे आंदोलन केले. त्यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी त्यांनी गैरवर्तन केल्याचा ठपका बन यांनी ठेवला आहे. अनिल देशमुख यांचा हात एका महिला कर्मचार्‍याला लागल्याचे या व्हिडिओत दिसत असल्याचा बन यांचा दावा आहे. त्यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओत एक गोल वर्तुळ केलेले आहे. तर एक बाण दाखवत महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करण्यात आल्याचा दावा बन यांनी केला आहे. तर त्याचवेळी आमदार रोहित पवार, काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांना सवाल करत देशमुख यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करणार का? असा सवाल विचारला आहे.

जंतर मंतरसह मुंबईत मोठे आरोप

20 जुलै रोजी जंतर मंतरवर सीजेपी आंदोलनादरम्यान महिला आंदोलकांवर, 12-14 वर्षांच्या मुलींवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यांचे कपडे फाडले. त्यांच्या गुप्तांगावर मारले. छातीवर पाय ठेवले असा आरोप कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांनी, अभिजीत दिपके यांनी केला. तर त्यानंतर काल मुंबईतही महिला आंदोलकांशी पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवण्यात आला. मुंबई पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहे. तर आता नवनाथ बन यांनी देशमुखांवर हा आरोप केल्याचे दिसून येत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तिबेटमध्ये ईशा फाउंडेशनचे ८० भक्त बेपत्ता… सद्गुरूंनी चीनकडे मोठी मागणी, व्हिडिओमध्ये भावूक झाले
  • Plane Crash : बारामतीनंतर आणखी एका ठिकाणी विमान कोसळलं; क्षणार्धात झाले अनेक तुकडे, दोघांचा मृत्यू
  • Nitesh Karale : राष्ट्रवादीचे नितेश कराळे मास्तर पोलिसांच्या ताब्यात; सोशल मीडियावरील एक चूक पडली महागात, राजकीय वर्तुळात खळबळ
  • Nepal Flood : जिथे हिमनदी फुटली, महाप्रलय आला; तिथे पोहोचलं चीनचं हेलिकॉप्टर, थरारक VIDEO
  • Dev Chaudhary: बॅट धरता येईना, कॅचही घेता येईना, ऑक्शनमध्ये नावंही नाही अन् थेट DPL मध्ये खेळला, विराट कोहलीच्या कोचशी थेट संबंध

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in