• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘मागे वळून पाहतो तेव्हा माझीच मला लाज वाटते..’; ‘आदिपुरुष’बद्दल अखेर मनोज मुंतशीर यांनी मान्य केली चूक

July 25, 2026 by admin Leave a Comment


ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा बिग बजेट चित्रपट जेव्हा 2023 मध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा प्रेक्षकांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. प्रभास, क्रिती सनॉन आणि सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट रामायण या पौराणिक कथेवर आधारित होता. मात्र या चित्रपटाने प्रेक्षकांची प्रचंड निराशा केली. यातील व्हिज्युअल इफेक्ट्सचा खालावलेला दर्जा आणि वादग्रस्त संवाद यांमुळे त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. त्यावेळी या चित्रपटाचे संवादलेखक मनोज मुंतशीर यांनी जरी ‘आदिपुरुष’चं समर्थन केलं असलं तरी आता ही आयुष्यातील सर्वांत मोठी चूक असल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

‘टाइम्स नाऊ’शी बोलताना मनोज मुंतशीर म्हणाले, “आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या जवळपास सहा महिने आधीच लोकांनी चित्रपट निर्मात्यांवर प्रश्न उपस्थित करण्यास आणि चित्रपटाला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. माझ्या पत्नीला भीती वाटत होती की निर्मात्यांना पाठिंबा दिल्यास मी लोकांच्या रोषाचं लक्ष्य बनेल. तिचं न ऐकल्याबद्दल मला आता पश्चात्ताप होत आहे. सुरुवातीला मला थोडं वाईट वाटलं होतं. काय घडलं हे समजायलाच मला दोन दिवस लागले. नंतर माझ्या लक्षात आलं की हा चित्रपट माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी चूक होती. त्याचं समर्थन करणं ही त्याहूनही मोठी चूक होती. या चित्रपटाच्या बाबतीत जे काही घडलं, त्याबद्दल मला खूप लाज वाटते. जे काही घडलं त्याबद्दल मी या देशाची माफी माहतो. आता जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा मी जे लिहिलं, त्याची मला लाज वाटते. ते लिहिताना मी काय विचार करत होतो, हे मला माहीत नाही.”

‘आदिपुरुष’ हा चित्रपट तब्बल 600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. प्रचंड ट्रोलिंग होऊनही या चित्रपटाने जगभरात 390 कोटी रुपयांची कमाई केली होती. यामध्ये प्रभासने प्रभू श्रीराम यांची, क्रिती सनॉनने सीतेची आणि सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली होती. 16 जून 2023 रोजी जगभरातील थिएटर्समध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in