• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महिलांना आधी 20000 नंतर 30000 रुपये, निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाचा खास प्लॅन, योगी सरकार…

August 13, 2026 by admin Leave a Comment


फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. अशातच आता सत्ताधारी भाजपने ही निवडणूक जिंकण्यासाठी खास योजना आखण्याच्या तयारीत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्यातील महिलांना तीन टप्प्यांत एकूण 50 हजार रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

उत्तर प्रदेशातील महिलांना 50 हजार रुपये मिळण्याची शक्यता

समोर आलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश सरकार राज्यातील गरीब व पात्र महिलांना प्रत्येकी 50 हजार रुपये देणार असल्याचे समोर आले आहे. निवडणुकीपूर्वी 20 हजार रुपये, तर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर 10-10 हजार अशा 3 हप्त्यांमध्ये उर्वरित रक्कम दिली जाऊ शकते. बिहारमध्ये अलिकडेच पार पडलेल्या निवडणुकीच्या काही दिवस आधी प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत 10 हजार रुपये देण्यात आले होते. त्यामुळे आता उत्तर प्रदेशातील महिलांनाही आगामी काळात अशीच रक्कम मिळण्याची शक्यता आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, अनेक राज्यांमध्ये महिलांसाठी जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक योजनांमुळे निवडणुकीचे चित्र बदलले आहे. बिहारसोबतच मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातही निवडणुकीपूर्वी महिलांसाठी अशाच प्रकारच्या योजना सुरू करण्यात आल्या होत्या. महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यात आले होते. त्याचा परिणाम निवडणूक निकालांवर स्पष्टपणे दिसून आला. याच मॉडेलच्या धर्तीवर आता उत्तर प्रदेश सरकार पुढे जाण्याच्या तयारीत आहे. महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा करून संपूर्ण कुटुंबाला आपल्या बाजूने वळवण्याची रणनीती तयार केली जात असल्याचे बोलले जात आहे.

तीन टप्प्यांत पैसे दिले जाणार

समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यातील पात्र महिलांना तीन टप्प्यांत आर्थिक मदत देण्याची तयारी केली जात आहे. पहिल्या हप्त्याच्या स्वरूपात 20 हजार रुपयांची आर्थिक मदत जमा केली जाऊ शकते. पुढील टप्प्यात 30 हजार रुपये एकाच वेळी किंवा तीन टप्प्यांत 10-10 हजार रुपये दिले जाऊ शकतात. याचा महिलांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे ही योजना गेमचेंजर ठरू शकते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! राज्यात घडामोडींना वेग, विरोधी पक्षाचे खासदार घेणार फडणवीसांची भेट
  • Egg Price Hike : आता खाण्याचेही वांदे… साखर, कांद्यानंतर अंड्याचे भाव वाढले, झटक्यात इतके झाले भाव?
  • याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 चौ. किमीचे आलीशान हॉटेल
  • मला नाही अब्रू आणि मी कशाला घाबरू… रूपाली चाकणकर यांच्यावर भडकल्या या नेत्या..
  • जगात खळबळ! अमेरिकेने घेतला व्हिसाबद्दल अत्यंत धक्कादायक निर्णय, थेट नियोजित..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in