• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महिलांच्या हर्बल टीचे मोदींनी ‘मन की बात’ मध्ये केले कौतूक, मग फोन येणे झाले सुरु…

July 26, 2026 by admin Leave a Comment


उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील एक छोटेसे गाव सध्या चर्चेत आहे. लक्खीवाला या गावातील महिलांनी त्यांच्या मेहनतीने एक हर्बल चहाचा प्रयोग सुरु केला आणि त्याचे रुपांतर आता वटवृक्षात रुपांतर होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ या एपिसोडमध्ये ‘विदुर प्रेरणा स्वदेशी हर्बल टी’ चे कौतूक केले आहे. यामुळे गावातील महिलांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. ही हर्बल चहा पावडर एकेकाळी महिला छोट्या स्तरावर तयार करीत होत्या. आता त्याची चर्चा संपूर्ण देशात होत आहे. या महिलांना आता त्यांचे नातेवाईक आणि तसेच नवीन ग्राहकांचे फोन येणे सुरु झाले आहे.

1 लाख रुपयातून कामाची सुरुवात

सुमारे एक वर्षांपूर्वी गावातील राहणारी बबीता राणी हीने काही महिलांच्या सोबत मिळून हर्बल टी चहा पत्ती बनवायची सुरुवात सुरु केली. सुरुवातीला सुमारे एक लाख रुपयांची गुंतवणूक करीत या व्यवसायाची मुहूर्तमेढ या महिलांनी रोवली. केवळ त्यांना चहा विकायचा नव्हता. तर गावातील महिलांना त्यांच्या पायावर उभे करायचे होते. हळूहळू लोकांना याचा चहा आवडू लागला. आणि मग ऑनलाईन ऑर्डर देखील मिळू लागल्या.

आता लाखांचा व्यवहार

‘विदुर प्रेरणा स्वदेशी हर्बल टी’ ची मागणी सतत वाढत आहे. या गटाला दिल्लीसह अनेक शहरातून ऑर्डर मिळत आहेत. वाढती मागणी सोबत या व्यवसायाचा वार्षिक टर्नओव्हर आता सुमारे १५ लाख रुपयांपर्यंत पोहचला आहे. ऑर्डरच्या हिशेबाने चहा तयार केला जातो. यामुळे गुणवत्तेवर संपूर्ण लक्ष ठेवले जाते.

11 महिला करताहेत काम

या स्वयं सहायता गटात सध्या ११ महिला जोडलेल्या आहेत. चहा तयार करण्यापासून ते पँकिंग, लेबल लावणे आणि ऑर्डर पाठवण्याचे संपूर्ण काम या महिला सांभाळतात. या गटातील महिलांना तर महिन्याला ८ ते १० हजार रुपयांची कमाई होते. यामुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती आधीपेक्षा चांगली झाली आहे.

या हर्बल टीची खासीयत काय ?

या चहामध्ये गुळवेळ ( गिलोय ) , ज्येष्ठमध, आंबी हळद, इलायची आणि बडीसौंफ सारखे मसाले टाकले जातात. हे सर्व मसाले शरीरासाठी चांगले असतात. यामुळे हा चहा लोकांना प्रचंड आवडत आहे.

कितीला विकला जाता चहा ?

हर्बल टीचे 100 ग्रॅमचे पॅकेट तयार केले जाते. या पाकिटावर 350 रुपये लिहिले जाते. ऑनलाईन आणि थेट ग्राहकांपासूनही ऑर्डर मिळत आहेत.

सरकारने दिला आधार –

काम वाढल्यानंतर या महिला गटाने मुख्यमंत्री युवा स्वरोजगार योजने अंतर्गत 10 लाख रुपयांचा लोन देखील मिळाले आहे. याच्या मदतीने उत्पादन वाढवणे आणि व्यवसायाला वाढवण्यास मदत झाली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की यामुळे अन्य महिलांना देखील त्यांचा व्यवसाय करण्यास प्रेरणा मिळत आहे.

पीएम मोदी यांच्या कौतुकामुळे हिम्मत वाढली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या रेडिओ पॉडकास्टमध्ये या हर्बल टीचा उल्लेख केल्याने या हर्बल चहाला सर्वदूर प्रसिद्धी मिळाली आहे. या गटाच्या संचालक बबीता राणी यांनी म्हटले आहे की त्यांच्या साठी हा मोठा सन्मान आहे. देशातील अनेक भागातून या चहाची विचारणा केली जात आहे. आता येत्या काही दिवसात चहाचा व्यवसाय आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे गावातील सर्वसामान्य महिलांना रोजगार मिळण्याची खात्री तयार झाली आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट… नेमकं काय घडलं?
  • काहीही झाले तरीही सर्वात अगोदर विचारपूस करण्यासाठी मला या व्यक्तीचा फोन येतो, तुकाराम मुंढे यांचा खुलासा..
  • तू मला ताप भरवूनच इथून जा…! सामना सुरू असताना ऋषभ पंत असं का म्हणाला? मैदानात काय घडलं?
  • अचानक कॉल आला… मला माफ करा, कुणालच्या मावशीने सांगितला अखेरचा संवाद; Khavdya Dongar प्रकरणात मोठी अपडेट
  • अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग… सुषमा अंधारे संतापल्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in