• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महाविकास आघाडीत मोठी बिघाडी? ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसने दंड थोपटले, दावनेंविरोधात उमेदवार देणार

April 29, 2026 by admin Leave a Comment


राज्यातील विधानपरिषद निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर आता महाविकास आघाडीत मोठी बिघाडी झाल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आता विधानपरिषदेसाठी उमेदवार देणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता या निवडणुकीतील रंगत आणखी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काँग्रेस उमेदवार देणार

महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर जाणार असल्याचे बोलले जात होते, मात्र आता उद्धव ठाकरे यांच्याऐवजी अंबादास दानवे यांना महाविकास आघाडीचे तिकीट देण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने जाहीर केले होते की उद्धव ठाकरे उमेदवार असल्यास आमचा पाठिंबा असेल, मात्र जर दुसरा कोणी उमेदवार असेल तर आम्ही उमेदवार देणार. त्यानुसार अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करून उमेदवार देणार असल्याची माहिती दिली आहे.

भाई जगताप काय म्हणाले?

विधानपरिषदेच्या उमेदवारीबाबत बोलताना काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी म्हटले की, प्रदेशाध्यक्ष सध्या दिल्लीत आहेत. कदाचित काँग्रेस उमेदवार देईल. आज लोकलेखा बैठकीसाठी मी आलो होतो, मला बाहेर काय घडलं ठाऊक नाही. दिल्लीच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. आम्ही अस्वस्थ नाही तुम्ही होऊ नका, स्वस्थ रहा. काँग्रेस, महाविकास आघाडी मोठा विषय आहे, तकलादू नाही. आम्ही जबाबदार आहोत, जबाबदारीने सगळं होईल. अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष करतील, मी नाही. माझ्या माहितीनुसार काँग्रेस पक्ष कदाचित आपला उमेदवार देईल.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका काय?

अंबादास दानवे यांचं नाव जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे यांनी म्हटले की, ‘राज्यसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीने शरद पवार यांनी पाठिंबा दिला होता. त्याचवेळी आम्ही विधानसभेला शिवसेनेचा जो उमेदवार असेल त्याला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषेदत असावेत, अशी आमची मागणी होती. मात्र आता अंबादास दानवेंना त्यांनी संधी दिली आहे, तर आमची काही हरकत नाही.’

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs SRH Toss : मुंबईने टॉस जिंकला, पलटणची बॅटिंग, हैदराबाद विरुद्ध रोहित खेळणार? पाहा प्लेइंग 11
  • MI vs SRH: नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला, पण हार्दिक पांड्याने ट्रेंड बदलत घेतला असा निर्णय
  • West Bangal Election | पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार? उलटफेर होणार का?
  • Baramati By Elections Exit Polls : बारामती पोटनिवडणुकीत चमत्कार? सुनेत्रा पवार यांचा विजय होणार का? थक्क करणारा एक्झिट पोल समोर!
  • ना मोबाईल, ना सोशल मीडिया… रेल्वे स्थानकावर झोपलेल्या 150 मजुरांमधून शोधला आरोपी, एका खूनाचा असा झाला रहस्यमयी उलगडा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in