• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

MI vs SRH: नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला, पण हार्दिक पांड्याने ट्रेंड बदलत घेतला असा निर्णय

April 29, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेतील नाणेफेकीचा कौल जिंकला की प्रथम गोलंदाजी घेण्याचा ट्रेंड सुरू आहे. मात्र यावेळी मुंबई इंडियन्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यात हार्दिक पांड्याने वेगळा निर्णय घेतला. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आयपीएल स्पर्धेत 41वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला आणि त्याने प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण नाणेफेक जिंकली की धावांचा पाठलाग करण्याचं गणित असतं. त्यात दुसर्‍या डावातील दव फॅक्टर महत्त्वाचं ठरतं. त्यात वानखेडेवर धावांचा पाठलाग करणं सोपं असतं. अशा स्थितीत मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने घेतलेल्या निर्णयाने आश्चर्य वाटणं सहाजिकच आहे. मुंबई इंडियन्सची स्पर्धेतील स्थिती नाजूक आहे. त्यामुळे हा सामना जिंकणं भाग आहे. त्यामुळे आता या निर्णयाच कितपत फायदा होतो हे सामन्याचा निकाल लागल्यावरच कळेल.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की, ‘आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. तुम्ही म्हटल्याप्रमाणे, आजचा दिवस चांगला आणि वाऱ्याचा दिसतोय, नेहमीच्या तुलनेत थोडा थंड आहे. मला नाही वाटत की दव पडेल, आम्ही हे लक्षात ठेवू आणि आम्ही फक्त फलंदाजी करून पाहू की किती धावा करू शकतो. मला वाटतं की आम्हा सर्वांसाठी नव्याने सुरुवात करणं महत्त्वाचं होतं, जास्त गुंतागुंत न करता, फक्त काही चांगल्या ‘बॉईज आफ्टरनून’ आयोजित करणं, जे आम्ही एक गट म्हणून केलं. आमचे काही सराव सत्रही चांगले झाले आहेत. त्यामुळे सर्व आवश्यक गोष्टी पूर्ण झाल्या, ज्यामुळे एक गट म्हणून आम्हाला वाटलं की आता मुलं ताजीतवानी होतील आणि सामन्यासाठी उत्सुक आहेत.’

हार्दिक पांड्या मिचेल सँटनरच्या गैरहजेरीबाबत म्हणाला की, ‘मिचेल सँटनर दुर्दैवी ठरला, आणि आज क्विनीसुद्धा. त्याच्या मनगटाला दुखापत झाली आहे. या संघात आम्ही काही बदल केले आहेत. क्विनीच्या जागी रायन रिकेल्टन आला आहे. आमच्याकडे रॉबिन मिन्झ आहे. रोहित अजून काही सामने नसेल. तो प्रयत्न करत आहे, पण त्याची कामगिरी त्याला हवी तशी नाही, त्यामुळे तो संघासाठी उपलब्ध नाही. त्याच्या फॉर्मबद्दल हे अगदी खरं आहे. आम्हालाही मैदानात उतरून माझ्या माहितीनुसार सर्वोत्तम क्रिकेट खेळायचे आहे. त्यामुळे संघाला आणि खेळाडूंच्या गटाला नक्कीच मदत होईल.’

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाजपला घवघवीत यश! 5 पैकी 3 राज्यांमध्ये कमळ फुलणार, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
  • Chanakya Niti : मोठं यश मिळालं तरी शांत राहा, चाणक्य यांनी सांगितले आयुष्यातील 4 कटू सत्य
  • अर्जुन तेंडुलकवर लागणार बोली, लिलावासाठी 5 लाखांची मूळ किंमत; कसं काय ते जाणून घ्या
  • Chanakya Exit Poll | ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता? Exit Polls चे थक्क करणारे आकडे समोर!
  • डाव्यांचा एकमेव गड ढासळणार, केरळमध्ये यावेळी काँग्रेसची सत्ता? Exit Polls चे चकित करणारे आकडे!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in