
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 89.99 टक्के मतदानाची नोंद झाली असून, पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुसऱ्या टप्प्यातही मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. याआधी झालेल्या पहिल्या टप्प्यात 152 जागांसाठी तब्बल 91 टक्के मतदान झाले होते, त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातही जवळपास 90 टक्क्यांच्या आसपास मतदान झाल्याने राज्यातील निवडणुकीची रंगत अधिकच वाढली आहे.
राज्यातील राजकीय वातावरण आधीपासूनच तापलेले असून, या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विशेषतः भवानीपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी आणि भाजप नेते सुभेंदू अधिकारी यांच्यात झालेली थेट लढत ही या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेची ठरली आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आपला पारंपरिक गड कायम राखण्यात यशस्वी ठरणार का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीचा निकाल 4 मे रोजी जाहीर होणार असून, त्यानंतर राज्यात सत्तेची सूत्रे नेमकी कोणाच्या हाती येणार, हे स्पष्ट होणार आहे.
Leave a Reply