• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

MI vs SRH Toss : मुंबईने टॉस जिंकला, पलटणची बॅटिंग, हैदराबाद विरुद्ध रोहित खेळणार? पाहा प्लेइंग 11

April 29, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 41 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने आहेत. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. मुंबईच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन हार्दिक पंड्या याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि हैदराबाद या दोन्ही संघांनी सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केला आहे.

मुंबईने प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. क्विंटन डी कॉक प्लेइंग ईलेव्हनचा भाग नाही. शेरफेन रदरफोर्ड याला बाहेर करण्यात आलं आहे. रायन रिकेल्टन याचं कमबॅक झालं आहे.
बॉलिंग ऑलराउंडर मिचेल सँटनर याच्या जागी विल जॅक्स याचा समावेश करण्यात आला आहे. विल आणि रायन हे दोघे मुंबईसाठी ओपनिंग करणार आहेत.

मिचेल सँटनर आणि क्रिष भगत या तिघांना मैदानाबाहेर व्हावं लागलं आहे. तर रायन रिकेल्टन, विल जॅक्स, ट्रेन्ट बोल्ट आणि रॉबिन मिंझ यांचं कमबॅक झालं आहे. बॉलिंग ऑलराउंडर मिचेल सँटनर याच्या जागी विल जॅक्स याचा समावेश करण्यात आला आहे. सनरायजर्स हैदराबादनमध्ये हर्ष दुबे याला शिवांग कुमार याच्या जागी संधी देण्यात आली आहे.

मुंबईची वानखेडेतील हैदराबाद विरुद्धची आकडेवारी

मुंबई इंडियन्सला या 19 व्या हंगामात वानखेडे स्टेडियममध्ये सलग 3 सामने गमवावे लागले आहेत. मात्र मुंबईचा वानखेडेत सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दबदबा राहिलेला आहे. मुंबईने हैदराबाद विरुद्ध 9 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तर हैदराबादला वानखेडेत 2 सामने जिंकता आले आहेत.

सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, हेनरिक क्लासेन, सलील अरोरा (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्ष दुबे, साकिब हुसेन, प्रफुल हिंगे आणि एशान मलिंगा.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कॅप्टन), रॉबिन मिन्झ, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, अल्लाह गझनफर आणि अश्वनी कुमार.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tamil Nadu Election Exit Poll Results 2026 : सुपरस्टार अभिनेत्याला सर्वात मोठा हादरा, भाजपचंही स्वप्न भंगल; तामिळनाडूच्या एक्झिट पोलच्या आकड्याने उडवली झोप
  • घरात असेल हा एक कीडा तर सगळं संपलंच म्हणून समजा; लाखो किमतीची वस्तू झटक्यात होईल खराब!
  • ऑपरेश सिंदूरदरम्यान भारतानं पाकिस्तासोबत काय केलं? चीनचा झोप उडवणारा दावा, जगभरात मोठी खळबळ
  • MI vs SRH : मुंबईचा वानखेडेत धमाका, हैदराबादसमोर सर्वात मोठा विक्रम
  • डाव्यांचा एकमेव गड ढासळणार, केरळमध्ये यावेळी काँग्रेसची सत्ता? Exit Polls चे चकित करणारे आकडे!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in