• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ऑपरेश सिंदूरदरम्यान भारतानं पाकिस्तासोबत काय केलं? चीनचा झोप उडवणारा दावा, जगभरात मोठी खळबळ

April 29, 2026 by admin Leave a Comment


पहलगाममध्ये भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये अनेक भारतीय नागरिकांनी आपला जीव गमावला. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठा एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानमधील 100 पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेले होते, तसेच त्यांची ठिकाणं देखील उद्ध्वस्त करण्यात आली. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. या युद्धात पाकिस्तानंच मोठं नुकसान झालं होतं. दरम्यान ऑपरेशन सिंदूरवर बोलताना आता चीनकडून मोठा दावा करण्यात आला आहे. चीनकडून नुकताच जागतिक सुरक्षा स्थिती रिपोर्ट 2025 जारी करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये चीनकडून भारताच्या ऑपरेशन सिंदूरबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.

नेमकं काय म्हटलं आहे चीनने?

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या चीनी आंतरराष्ट्रीय अभ्यास संस्था या संस्थेच्या वतीने हा रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये भारताच्या ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना मोठा दावा करण्यात आला आहे. ज्यामध्ये म्हटलं की गेल्या वर्षी भारत आणि पाकिस्तामध्ये चांगलाच संघर्ष उफाळून आला होता, गेल्या वीस वर्षांमध्ये पहिल्यांदाच असं घडलं. या रिपोर्टमध्ये चीनने अशी अधिकृतरित्या कबुली दिली आहे की, भारताने ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या अणू स्थळांच्या जवळ हल्ले केले होते. यामध्ये असाही उल्लेख आहे की, भारताने पाकिस्तानच्या कैराना हिल्स परिसरात हल्ला केला होता. एवढंच नाही तर पाकिस्तानकडून सुरू असलेली आण्विक युद्धाची ब्लॅकमेलिंग संपवण्यासाठी भारताकडून पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर देखील हल्ला करण्यात आला, असं चीनने आपल्या या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

चीनने पाकिस्तान आणि भारताबद्दल बोलताना केलेल्या या दाव्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर चीनकडून भारतासोबत जवळीकता वाढवण्याचा प्रयत्न देखील सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर चीनकडून या टॅरिफचा निषेध करण्यात आला होता. भारतासाठी चीनच्या बाजारपेठा खुल्या आहेत, असंही चीनने त्यावेळी म्हटलं होतं.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • GT vs RCB Live Streaming : गुजरात-बंगळुरु आमनेसामने, शुबमनसेना विराटच्या टीमला पराभूत करणार?
  • IPL 2026 : Vaibhav Sooryavanshi सर्व फलंदाजांपेक्षा सरस, आकडेच सांगतात सर्व काही
  • ताटात तीन पोळ्या एकत्र का नाही दिल्या जात नाही?
  • जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क कोणता Phone वापरतात? उत्तर वाचून हैराण व्हाल
  • MI vs SRH : रायन रिकेल्टनचं विक्रमी शतक, वानखेडेत तिलकसह जयसूर्याचा रेकॉर्ड ब्रेक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in