• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

MI vs SRH : रायन रिकेल्टनचं विक्रमी शतक, वानखेडेत तिलकसह जयसूर्याचा रेकॉर्ड ब्रेक

April 29, 2026 by admin Leave a Comment


मुंबई इंडियन्सचा स्टार ओपनर रायन रिकेल्टन याने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 41 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध धमाका केला आहे. रायनने वानखेडे स्टेडियममध्ये चाबूक शतक झळकावलं आहे. रायन यासह 19 व्या मोसमात शतक करणारा एकूण आठवा तर मुंबईचा तिसरा फलंदाज ठरला आहे. तसेच मुंबई एका हंगामात 3 शतकं करणारी दुसरी टीम ठरली आहे. मुंबईआधी सनरायजर्स हैदराबादने अशी कामगिरी केली आहे.

रायन रिकेल्टन याचं रेकॉर्डब्रेक शतक

नितीश कुमार रेड्डी याने टाकलेल्या 15 व्या ओव्हरमधील सहाव्या आणि शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेतली. रायनने अशाप्रकारे 44 चेंडूत शतक पूर्ण केलं. रायनने या 227.27 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं. रायनने या दरम्यान 7 षटकार आणि 8 चौकार लगावले. रायनचं हे टी 20 कारकीर्दीतील चौथं आणि आयपीएलमधील पहिलं शतक ठरलं.

रायनने शतकासह कुणाला पछाडलं?

रायन मुंबईसाठी आयपीएल स्पर्धेत वेगवान शतक करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. रायनने मुंबईसाठी वेगवान शतकाबाबत तिलक वर्मा, सनथ जयसूर्या, कॅमरुन ग्रीन आणि सूर्यकुमार यादव आणि यांना मागे टाकलं आहे. रायनने यासह 18 वर्षांआधीचा विक्रम मोडीत काढला आहे.रायनने तिलक वर्मा आणि सनथ जयसूर्या या दोघांना आयपीएल स्पर्धेत मुंबईसाठी वेगवान शतकाबाबत मागे टाकलं आहे. रायनने तिलक आणि सनथच्या तुलनेत 1 बॉलआधी शतक पूर्ण केलं आहे. तिलकने अवघ्या काही दिवसांआधी 45 चेंडूत शतक पूर्ण केलं होतं. तर सनथ जयसूर्या याने आयपीएलच्या पहिल्याच मोसमात 2008 साली 45 बॉलमध्ये शतक झळकावलं होतं. तर रायनने आता 44 चेंडूत शेकडा पूर्ण केलाय.

स्कोअरकार्ड

मुंबई इंडियन्ससाठी वेगवान शतक करणारे फलंदाज

रायन रिकेल्टन, 44 बॉल, विरुद्ध हैदराबाद, मुंबई, 2026

तिलक वर्मा, 45 बॉल, विरुद्ध गुजरात टायटन्स, अहमदाबाद, 2026

सनथ जयसूर्या, 45 बॉल, विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, मुंबई, 2008

कॅमरुन ग्रीन, 47 बॉल, विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, मुंबई, 2023

सूर्यकुमार यादव, 49 बॉल, विरुद्ध गुजरात टायटन्स, मुंबई, 2023

19 व्या मोसमातील शतकवीर

दरम्यान आतापर्यंत 19 व्या मोसमात मुंबईसाठी रायनआधी तिलक वर्मा आणि क्विंटन डी कॉक या दोघांनी शतक लगावलं आहे. तसेच या दोघांव्यतिरिक्त संजू सॅमसन, वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, केएल राहुल आणि साई सुदर्शन यांनीही शतक केलं आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हजारो लोक आजूबाजूला तरी तुम्ही एकटे का पडता? चाणक्यांनी सांगितलं तुम्ही काय चूक करताय?
  • Vastu Shastra : पैशांचे व्यवहार करताना कायम या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा व्हाल कंगाल
  • MI vs SRH : हेड-क्लासेनचा झंझावात, हैदराबादचा विजयी पंच, मुंबईचा 6 विकेट्सने धुव्वा
  • IPL 2026 Points Table : हैदराबादला मुंबई विरुद्धच्या विजयानंतर मोठा फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी?
  • IPL 2026: मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात, सहाव्या पराभवानंतर हार्दिक पांड्या म्हणाला..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in