• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : पैशांचे व्यवहार करताना कायम या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा व्हाल कंगाल

April 29, 2026 by admin Leave a Comment


वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये केवळ तुमच्या घराच्या रचनेबद्दलच माहिती देण्यात आलेली नाहीये, तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्यास त्याचा प्रचंड त्रास तुम्हाला होण्याची शक्यता असते, ही नकारात्मक ऊर्जा कमी करून ऊर्जा संतुलन कसं निर्माण करायचं? याबद्दल देखील वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार काही विशिष्ट वार असे असतात त्या दिवशी तुम्ही जर एखाद्याकडून कर्ज घेतलं असेल तर ते परतफेड करण्यासाठी शुभ मानले जातात. तर काही विशिष्ट वार असेही असतात या दिवशी चुकूनही कोणाकडून कर्ज घेऊ अथवा देऊ नये, तर काही वार असे असतात जे पैसे देण्यासाठी किंवा घेण्यासाठी शुभ मानले जातात. आज आपण याबद्दल वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगण्यात आलं आहे? पैशांच्या व्यवहारांसाठी कोणते वार शुभ आहेत? कोणते अशुभ? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

मंगळवार – तुम्ही जर एखाद्याकडून कर्ज घेतलं असेल तर ते मंगळवारी परत करणं हे शुभ मानलं जातं. कारण तुम्ही जेव्हा मंगळवारी एखाद्याकडून घेतलेले पैसे परत करतात, तेव्हा तुमच्यावरील कर्जाचं ओझं कमी होतं. एवढंच नाही तर मंगळाची सकारात्मक ऊर्जा तुम्हाला मदत करते. मात्र मंगळवारी कधीही कोणाकडूनही कर्ज घेऊ नये, कारण या दिवशी घेतलेलं कर्ज लवकर फिटत नाही. मंगळवार हा मंगळ ग्रहाचा वार आहे, त्यामुळे या दिवशी उग्र ऊर्जा असते, त्यामुळे या दिवशी कर्ज घेऊ नये, असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.

बुधवार – बुधवारी कोणालाही कर्ज देऊ नये असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे कारण बुधवार या दिवसाचा संबंध हा बुध ग्रहाशी असतो. हा ग्रंथ वाणी बुद्धीशी संबंधित आहे. त्यामुळे तुम्ही जर बुधवारी एखाद्या व्यक्तीला पैसे दिले असतील तर ते पैसे परत वापस येण्याची शक्यता नसते, त्यामुळे शक्यतो बुधवारी कोणालाही कर्ज देऊ नये, जर एखादा खूपच संकटात सापडला असेल तर तुम्ही मानवतेच्या नात्याने त्याला मदत करू शकतात. परंतु बुधवारी कोणालाही कर्ज देणं टाळावं असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

शुक्रवार – शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असतो, त्यामुळे हा दिवस सर्व प्रकारच्या पैशांच्या व्यवहारांसाठी शुभ मानला जातो. तुम्ही या दिवशी पैसे देऊ किंवा घेऊ शकतात. जे पैशांचे व्यवहारा शुक्रवारी होतात, त्यामध्ये लक्ष्मी मातेच्या कृपेनं बरकत प्राप्त होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, त्यामुळे सर्व प्रकारच्या पैशांच्या व्यवहारांसाठी शुक्रवार हा शुभ दिवस मानला जातो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भैय्यांना मराठी शिकवलं तर ते उद्या…, राज ठाकरेंची मिश्कील टिप्पणी, दिलं ओपन चॅलेंज..
  • Baranmati Bypoll Election Exit Poll | बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार? कोणाचा वरचष्मा; वाचा काय होणार?
  • उन्हामुळे गाईंची तब्येत बिघडली; फॉगर बसवत शेतकऱ्याचा तापमान नियंत्रणाचा अनोखा प्रयोग…
  • 30 April 2026 Horoscope : महिन्याच्या शेवटच्या दिवशी नशीब फळफळणार, 3 राशींच्या आयुष्यात घडणार चमत्कारिक गोष्टी!
  • हजारो लोक आजूबाजूला तरी तुम्ही एकटे का पडता? चाणक्यांनी सांगितलं तुम्ही काय चूक करताय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in